शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

अण्वस्त्रांनंतर आता हे घातक शस्त्र बनवतोय किम जोंग उनचा उत्तर कोरिया! कशासाठी सुरू आहे हा अट्टहास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 20:59 IST

महत्वाचे म्हणजे, उत्तर कोरियामध्ये रासायनिक शस्त्रे वाहून नेणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी आधीच घेण्यात आली आहे. किम जोंग उन, रासायनिक शस्त्रांना एक धोरणात्मक प्रतिबंधात्मक मानतात. म्हणूनच त्याच्या संशोधन, विकास आणि निर्मितीच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. 

उत्तर कोरियाने अणुबॉम्बनंतर आणखी एका घातक शस्त्र तयार करण्याचे काम सुरू केले आहे. हे असे शस्त्र आहे जे विकसित होताच, कोणत्याही युद्धात उत्तर कोरियाचा विजय सुनिश्चित करेल. महत्वाचे म्हमजे, खुद्द किम जोंग उन यांनी स्वतःच हे शस्त्र तयार करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक मीडिया आउटलेट डेली एनके के नुसार, हे धोकादायक शस्त्र रासायनिक शस्त्र असेल. उत्तर कोरियाने त्याच्या निर्मितीची प्रक्रियाही सुरू केली आहे.

महत्वाचे म्हणजे, उत्तर कोरियामध्ये रासायनिक शस्त्रे वाहून नेणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी आधीच घेण्यात आली आहे. किम जोंग उन, रासायनिक शस्त्रांना एक धोरणात्मक प्रतिबंधात्मक मानतात. म्हणूनच त्याच्या संशोधन, विकास आणि निर्मितीच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. 

सर्वात घातक असेतं रासायनिक शस्त्र -युद्धाच्या तयारीसाठी रासायनिक शस्त्रे ही सर्वात शक्तिशाली शस्त्रांपैकी एक मानली जातात. युद्ध आणि संघर्षाच्या परिस्थितीनुसार, त्यांचा वापर अण्वस्त्रांसोबतही केला जाऊ शकतो. डेली एनकेमध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, अणुबॉम्बसोबत रासायनिक शस्त्रांचा वापर शत्रूला पूर्णपणे कमकुवत करू शकतो.

१.२५ लाख लोकांचा बळी घेऊ शकते एक हजार किलो ग्रॅम सरीन -अमेरिकेतील रँड कॉर्पोरेशनने २०२२ मध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता. यात उत्तर कोरियाच्या रासायनिक शस्त्र कार्यक्रमासंदर्भातही चिंता व्यक्त करण्यात आली होती. यात, "एक हजार किलो ग्रॅम सरीन सुमारे १ लाख २५ हजार लोकांचा बळी घेऊ शकते," असा दावाही करण्यात आला होता. महत्वाचे म्हणजे, उत्तर कोरियाने रासायनिक शस्त्रांचे व्यवस्थापन करण्यासाठी न्यूक्लियर केमिकल डिफेन्स ब्युरो देखील तयार केला आहे. 

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरिया