शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अबब ! ६८ वर्षीय महिलेने ७७१ वेळा दिली ड्रायव्हिंग टेस्ट

By admin | Updated: March 31, 2016 16:50 IST

दक्षिण कोरियामधील 68 वर्षीय जिद्दी महिलेने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी एक-दोन वेळा नाही तर तब्बल 771 वेळा प्रयत्न केला आहे

ऑनलाइन लोकमत -
सेऊल, दि. ३१ - अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हणतात. पण जर वारंवार अपयश मिळत असेल तर अनेकजण प्रयत्न करणेच सोडून देतात. एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही कितीवेळा प्रयत्न कराल ? असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर कदाचित दोन आकड्यांच्या पुढे जाणार नाही. मात्र दक्षिण कोरियामधील 68 वर्षीय जिद्दी महिलेने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी एक-दोन वेळा नाही तर तब्बल 771 वेळा प्रयत्न केला आहे. ऐकून तुमचा विश्वास बसत नसेल मात्र हे खरं आहे.  
 
या आजीबाईंना चा नावाने ओळखलं जात. 2005 पासून ही महिला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. 'सुरुवातीला तर प्रत्येक दिवशी ही महिला ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी यायची. हा एक रोकॉर्डब्रेकींग नंबर असल्याचं', पोलीस अधिकारी चोई याँग-चेओल सांगतात. चा पुन्हा 772व्यांदा प्रयत्न करेल असा विश्वासदेखील अधिकारी व्यक्त करतात.
 
'ड्रायव्हिंग लायसन्ससाठी घेण्यात येणा-या प्राथमिक लेखी परिक्षेतच चा नापास होत आहे. पास होण्यासाठी 100 पैकी 60 गुणांची आवश्यकता आहे, मात्र चा यांना 30 ते 35 गुणच मिळत आहे. ड्रायव्हिंग टेस्टसाठी आतापर्यंत चा ने 2 लाखाहून जास्त पैसे खर्च केले आहेत. कारण प्रत्येक टेस्टसाठी 285 रुपये खर्च आहे', अशी माहिती पोलीस अधिकारी चोई याँग-चेओल यांनी दिली आहे. 
 
चा घरोघरी जाऊन घरगुती सामान आणि फळ विकण्याचं काम करतात. यासाठी त्यांनी सर्व सामान हातात घेऊन फिरावं लागतं. मात्र या कामासाठी आपली कार असावी अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी  ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याचा चा प्रयत्न करत आहे. 'चा जेव्हा जेव्हा नापास होतात तेव्हा मला दुख: होतं मात्र जेव्हा त्या पास होतील तेव्हा मी आनंद साजरा करेन', असं पोलीस अधिकारी चोई याँग-चेओल यांनी सांगितलं आहे.