नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 06:35 IST2025-06-09T06:35:14+5:302025-06-09T06:35:50+5:30

United State: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने नेपाळला दिलेला तात्पुरत्या संरक्षित स्थितीचा (टीपीएस) दर्जा काढून घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या ७ हजारांपेक्षा अधिक नेपाळी नागरिकांना हा देश सोडावा लागणार आहे.

7,000 Nepalese people will have to leave America, America withdraws special country status | नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

काठमांडू - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने नेपाळला दिलेला तात्पुरत्या संरक्षित स्थितीचा (टीपीएस) दर्जा काढून घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या ७ हजारांपेक्षा अधिक नेपाळी नागरिकांना हा देश सोडावा लागणार आहे. २०१५ साली नेपाळमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर अमेरिकेने या देशाला टीपीएस दर्जा दिला होता. नेपाळला दिलेला टीपीएस दर्जा २४ जून रोजी संपणार आहे. मात्र, त्यानंतर टीपीएसची मुदत वाढवली जाणार नसल्याचे अमेरिकेचे गृहमंत्री क्रिस्टी नोएम यांनी म्हटले आहे.

काय आहे नियम?
टीपीएसचा दर्जा समाप्त झाल्यापासून पुढे ६० दिवस म्हणजे ५ ऑगस्टपर्यंत नेपाळच्या नागरिकांना अमेरिका सोडावी लागणार आहे. टीपीएस दर्जा प्राप्त देशांच्या नागरिकांना कायदेशीर अटींशिवाय अमेरिकेत १८ महिने राहता येते.
नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर अमेरिकेने सर्वप्रथम २४ जून २०१५ रोजी १८ महिन्यांच्या कालावधीसाठी टीपीएस दर्जा दिला होता. त्यानंतर १६ ऑक्टोबर २०१६ रोजी या दर्जात आणखी १८ महिन्यांसाठी वाढ केली होती. नंतरच्या काळात अमेरिकन सरकारने अनेकदा टीपीएस दर्जात वाढ केली. जवळपास १२,७०० नेपाळी नागरिकांना हा दर्जा प्राप्त झालेला आहे.

Web Title: 7,000 Nepalese people will have to leave America, America withdraws special country status