एका तासात लावली ५० हजार झाडे

By Admin | Updated: June 7, 2015 23:08 IST2015-06-07T23:08:21+5:302015-06-07T23:08:21+5:30

भूतानसारख्या देशाने पर्यावरण दिनानिमित्त ५० हजार झाडे लावली असून, त्याची नोंद गिनीज बुकात करण्यात आली आहे.

50 thousand trees planted in one hour | एका तासात लावली ५० हजार झाडे

एका तासात लावली ५० हजार झाडे

थिम्पू : नुकत्याच झालेल्या पर्यावरणदिनी विविध देशांनी विविध उपक्रम पार पाडले. बहुतांश जणांनी वाढलेल्या उष्णतेवर लेख लिहीत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. पण भूतानसारख्या देशाने पर्यावरण दिनानिमित्त ५० हजार झाडे लावली असून, त्याची नोंद गिनीज बुकात करण्यात आली आहे. येथील १०० लोकांनी एका तासात ५० हजार झाडे लावली आहेत. भूतानचे राजे जिग्मे सिग्मे वांगचूक हे पर्यावरणप्रेमी आहेत.
तेथील राज्यघटनेनुसार देशातील ६० टक्के भागात वने असलीच पाहिजेत. पर्यावरणप्रेमी राजाचा ६० वा वाढदिवस आणि पर्यावरण दिन असा मुहूर्त साधत भूतानचा कृषी व वन विभाग व राजाच्या षट्यब्दीपूर्तीसाठी नागरिकांच्या पिक्सा या संस्थेतर्फे विश्वविक्रमी झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी १०० नागरिकांनी एकत्र येऊन एका तासात ४९ हजार ६७२ झाडे लावली. याआधी आसाममध्ये एका तासात ४० हजार ८८५ झाडे लावण्यात आली होती.
या वृक्षारोपणामुळे ड्यूक ग्यालपो जिग्मे सिग्मे वांगचूक व भूतानचे पाचवे राजे जिग्मे ख्येसर नामग्याल वांगचूक यांच्यासह प्रत्येक नागरिकाला तुमचा अभिमान वाटत आहे, असे भूतानच्या राजमाता दोरजी वाग्मो वांगचूक यांनी म्हटले आहे. वृक्षारोपणाचा हा उपक्रम पिक्साचे कर्मा शेरिंग यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. हा विक्रम कोणी मोडला तर आम्ही तो पुन्हा नव्याने प्रस्थापित करू असे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 50 thousand trees planted in one hour