शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

४० लाख कर्मचाऱ्यांचे संगणक हॅक

By admin | Updated: June 6, 2015 00:08 IST

अमेरिकेतील ४० लाख आजी-माजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संगणकावरील खाजगी माहिती हॅक करण्यात आली

वॉशिंग्टन : अमेरिकेतील ४० लाख आजी-माजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संगणकावरील खाजगी माहिती हॅक करण्यात आली असून, या हॅकिंगमागे चिनी नागरिक असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. चीनने हा आरोप फेटाळला आहे.अमेरिकेच्या संगणक विश्वातील हल्ल्याचा हा सर्वांत ताजा गुन्हा असून, या हॅकिंगचा सर्वाधिक परिणाम सरकारच्या कर्मचारी व्यवस्थापन विभागावर झालेला आहे. या विभागातील संगणकावर कर्मचाऱ्यांचे खाजगी तपशील व सुरक्षाविषयक माहिती होती. अमेरिकेच्या तपास अधिकारी व सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या सायबर हल्ल्यामागे परदेशी संस्था वा सरकार आहे. हल्ल्याशी चिनचा संबंध असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. चिनी दूतावासाकडून खंडन वॉशिंग्टन येथील चिनी दूतावासाने या आरोपांचे खंडन केले असून, अमेरिकेचे हे आरोप बेजबाबदार व खोडसाळपणाचे आहेत, असे म्हटले आहे. परदेशी संस्थांकडून झालेल्या या हॅकिंगचा तपास लावणे अवघड आहे, असेही या चिनी प्रवक्त्याने म्हटले आहे. कर्मचारी व्यवस्थापन विभागाने आता आपल्या आयटी व्यवस्थेवर तसेच खात्याच्या अंतर्गत माहिती केंद्रावर हल्ला झाला, असे म्हटले आहे. अंतर्गत माहिती केंद्रात कर्मचाऱ्यांची खाजगी माहिती सेव्ह केलेली होती. (वृत्तसंस्था)एफबीआयचा तपास ४एफबीआयने या सायबर हल्ल्याचा शोध सुरू केला असून, लवकरच जबाबदार गुन्हेगारांना समोर आणू, असे म्हटले आहे. एप्रिल महिन्यात सरकारच्या माहिती यंत्रणेवर असाच हल्ला करण्यात आला. मे महिन्याच्या सुरुवातीस अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने ४० लाख कर्मचाऱ्यांच्या संगणकावर परिणाम झाला, असे म्हटले होते. मात्र, नक्की कोणती माहिती बाधित झाली हे तेव्हा सांगण्यात आले नव्हते. ४अमेरिकन सरकारने चीनकडून आपल्या गोपनीय माहितीवर हे हल्ले होत असल्याची तक्रार आधीही केली आहे. चीनने ही समस्या दूर करावी, अशी विनंतीही अमेरिकेने या आधी केली होती. ४चिनी दूतावासाचे प्रवक्ते झू हैक्वान यांनी चीनवर केलेला आरोप फेटाळला असून, चीनकडून होणारे सायबर हल्ले रोखण्यासाठी चीन सरकारने बरेच प्रयत्न केले, असे म्हटले आहे. व्हाईट हाऊसने या हल्ल्यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.४२०१४ साली चिनी घुसखोरांनी कर्मचारी व्यवस्थापन विभागावर हल्ला केला होता. त्यावेळी दहा हजार कर्मचाऱ्यांच्या फाईल चोरण्यात आल्या होत्या. या फाईलमध्ये सुरक्षाविषयक आरोपातून मुक्त करण्याची विनंती करण्यात आली होती, असे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले आहे. ४कर्मचारी व्यवस्थापन विभागावर या आधीही सायबर हल्ला झाला होता. या विभागात परराष्ट्र खात्याशी संबंधित माहिती संगणकावर असते, तसेच व्हाईट हाऊस व अमेरिकन पोस्टल खाते यांचीही गोपनीय माहिती या विभागातील संगणकावर असते.