शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

3 लग्न... 5 मुलं...! 78 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात कोण-कोण...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:09 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आईचे नाव मेरी तर वडिलांचे नाव फ्रेडरिक ट्रम्प होते. त्याच्या आईचा जन्म स्कॉटलंडमध्ये आणि वडिलांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता. मेरी आणि फ्रेडरिक यांना पाच मुले होती. यात ट्रम्प यांचा चौथा क्रमांक. ट्रम्प यांना दोन भाऊ आणि दोन बहिणी...

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. फॉक्स न्यूजनुसार, त्यांनी इलेक्टोरल कॉलेजचा 270 मतांचा आवश्यक असलेला आकडा जवळपास गाठला आहे. मात्र, निवडणुकीचा निकाल अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. 78 वर्षीय ट्रम्प हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीबरोबरच वैयक्तिक आयुष्यासंदर्भातही चर्चेत राहतात. त्यांना चार भाऊ-बहिणी होते. टम्प यांनी तीन लग्न केले असून त्यांना पाच मुलं आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आईचे नाव मेरी तर वडिलांचे नाव फ्रेडरिक ट्रम्प होते. त्याच्या आईचा जन्म स्कॉटलंडमध्ये आणि वडिलांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता. मेरी आणि फ्रेडरिक यांना पाच मुले होती. यात ट्रम्प यांचा चौथा क्रमांक. ट्रम्प यांना दोन भाऊ आणि दोन बहिणी. त्यांच्या एका भावाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या दोन बहिणींची नावे मारियान आणि एलिझाबेथ अशी आहेत. तर फ्रेड ज्युनियर आणि रॉबर्ट अशी त्याच्या भावांची नावे आहेत. ट्रम्प यांच्या भावंडांनीही वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवला आहे.

ट्रम्प यांच्या पत्नी आणि मुले - डोनाल्ड ट्रम्प यांनी 1949 मध्ये मॉडेल इव्हानाशी पहिले लग्न केले. त्यांना इव्हाना पासून डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर, इवांका ट्रम्प आणि एरिक अशी तीन मुले आहेत. त्यांनी 1949 मध्ये लग्न केले आणि 1962 मध्ये घटस्फोट झाला. इव्हानापासून घटस्फोट घेतल्यानंतर ट्रम्प यांनी 1963 मध्ये अमेरिकन अभिनेत्री मार्ला मॅपल्सशी लग्न केले. डोनाल्ड आणि 55 वर्षीय मारला यांना 23 वर्षांची मुलगी टिफनी आहे. डोनाल्ड आणि मार्ला यांचाही 1999 मध्ये घटस्फोट झाला. नंतर, डोनाल्ड यांनी 2005 मध्ये मेलानियाशी लग्न केले. मेलानिया सध्या त्याच्या पत्नी आहेत. स्लोव्हेनियामध्ये जन्मलेल्या 49 वर्षीय मेलानिया, या पूर्वी मॉडेल होत्या. डोनाल्ड आणि मेलानिया यांना बॅरन नावाचा एक 13 वर्षांचा मुलगाही आहे.

अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष असतील -ट्रम्प आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होत आहेत. ते अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष असतील. रिपब्लिकन पक्षाने 2015 मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत विजय मिळवला होता. मात्र, 2020 मध्ये ते पराभूत झाले होते. आता 2024 मध्ये ते पुन्हा विजेयी झाले आहेत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUS ElectionAmerica ElectionAmericaअमेरिका