शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे २७0 मच्छीमार, ५४ नागरिक पाकच्या ताब्यात; भारताकडे पाकिस्तानचे ९७ मच्छीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 23:06 IST

दोन्ही देशांनी परस्परांच्या नागरिकांची सुटका करण्याची स्वयंसेवी संस्थेची मागणी

राजकोट : भारताचे २७0 मच्छीमार आणि ५४ सामान्य नागरिक आपल्या ताब्यात असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे. दुसरीकडे भारताने आपल्या ताब्यात ९७ पाकिस्तानी मच्छीमार आणि २६५ सामान्य नागरिक असल्याचे म्हटले आहे.

दोन्ही देशांनी आपापल्या ताब्यातील परस्परांच्या नागरिकांची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर ताब्यातील या नागरिकांची यादी मुत्सद्यांमार्फत एकमेकांना हस्तांतरित करण्यात आली, असे ‘पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी’ (पीआयपीएफपीडी) या संस्थेचे माजी सचिव जतीन देसाई यांनी सांगितले.

देसाई यांनी म्हटले की, भारत आणि पाकिस्तान यांनी २00८ मध्ये यासंबंधी एक करार केलेला आहे. त्यानुसार, दोन्ही देश दर सहा महिन्यांनी आपापल्या ताब्यातील परस्परांच्या नागरिकांची माहिती एकमेकांना देतात. १ जानेवारी आणि १ जुलै रोजी ताब्यातील नागरिकांची यादी परस्परांना हस्तांतरित केली जाते. देसाई यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या ताब्यातील बहुतांश मच्छीमार गुजरात आणि शेजारील केंद्रशासित प्रदेश दीवचे आहेत. दोन्ही देशांनी मच्छीमारांची तातडीने मुक्तता करायला हवी. मच्छीमार निरपराध आहेत. त्यांच्याकडून केवळ चुकीने सागरी सीमा ओलांडली गेली आहे.

‘पीआयपीएफपीडी’ ही स्वयंसेवी संस्था असून, भारत आणि पाकिस्तान यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हावेत, यासाठी ती काम करते. या संस्थेच्या दोन्ही देशांत शाखा आहेत. देसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी भारत-पाकिस्तान संयुक्त न्यायालयीन समिती कार्यरत होती. दोन्ही देशांनी सर्व मच्छीमारांची सुटका करायला हवी, अशी शिफारस या समितीने आपल्या प्रत्येक अहवालात केली आहे. दुर्दैवाने आता ही समिती कार्यरतच नाही. सामान्य नागरिकांचीही विनाअट सुटका व्हायला हवी. परस्परांच्या महिला कैद्यांचीही दोन्ही देशांनी तातडीने सुटका करायला हवी. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महिला कैदी आणि इतर नागरिकांवर दोन्ही देशांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवू नयेत.पाकने समिती सदस्य निवडावेदेसाई यांनी म्हटले की, भारत-पाकिस्तान न्यायालयीन समितीवरील आपल्या चार सदस्यांची पाकिस्तानने तातडीने नेमणूक करून ही समिती कार्यरत करण्याच्या दिशेने पाऊल उचलावे. परस्परांच्या कैद्यांची सुटका करण्यासाठी समितीची बैठक शक्य तितक्या लवकर बोलवायला हवी. अलीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडले आहेत. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांच्या सुटकेचा मुद्दा गंभीर आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान