पाकमध्ये २६० उष्माबळी

By Admin | Updated: June 22, 2015 23:51 IST2015-06-22T23:51:12+5:302015-06-22T23:51:12+5:30

पाकिस्तानातील बहुतांश भागात सध्या तीव्र उष्णतेची लाट पसरलेली असून सिंध प्रांतता या लाटेचे २६०बळी गेले आहेत, पाकिस्तानातगेल्या दशकभरातील सर्वात तीव्र

260 incense in Pak | पाकमध्ये २६० उष्माबळी

पाकमध्ये २६० उष्माबळी

कराची : पाकिस्तानातील बहुतांश भागात सध्या तीव्र उष्णतेची लाट पसरलेली असून सिंध प्रांतता या लाटेचे २६०बळी गेले आहेत, पाकिस्तानातगेल्या दशकभरातील सर्वात तीव्र अशी उष्णता आहे. कराचीचे तापमान सध्या ४५ सेंटिग्रेड आहे. त्यातच विजेचा तुटवडा असून वीज वारंवार खंडित होत आहे. उष्णतेचा प्रकोप असाच जारी राहील असे वाटत असताना सोमवारी जोरदार पाऊस व गार वारे यामुळे वातावरण सुसह्य झाले आहे.
रमजानचा काळ
रमजान सुरू असल्याने दिवसा सर्वांचे उपवास असतात, त्यामुळे उष्णतेचा त्रास अधिकच होत आहे. सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सईद कैम अली शाह यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन कराची शहर व सिंध प्रांतातील रुग्णालयात आणीबाणी जारी केली आहे. वीज पुरवठा खंडित होऊ देऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. सर्व रुग्णालयांना सातत्याने वीजपुरवठा व पाणीपुरवठा करण्यात यावा असे आदेश दिले आहेत.
जिना रुग्णालयाच्या प्रमुख सिमी जमाली यांनी दिलेल्या माहितीनुसार मरण पावणारे बहुतांश लोक वृद्ध आहेत.(वृत्तसंस्था)
 

 

Web Title: 260 incense in Pak