नाकेबंदीमुळे होर्मुझमध्ये २० हजार खलाशी फसले; मानवी मदत पोहोचवण्यात अडथळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:46 IST2026-04-29T10:45:22+5:302026-04-29T10:46:00+5:30

इराण-अमेरिकेच्या नाकाबंदीच्या वादात खलाशांच्या जीवाबरोबर जागतिक तेल पुरवठा धोक्यात

20,000 sailors stranded in Hormuz due to blockade; obstacles to humanitarian aid delivery | नाकेबंदीमुळे होर्मुझमध्ये २० हजार खलाशी फसले; मानवी मदत पोहोचवण्यात अडथळे

नाकेबंदीमुळे होर्मुझमध्ये २० हजार खलाशी फसले; मानवी मदत पोहोचवण्यात अडथळे

दुबई/वॉशिंग्टन : जगाच्या तेलाचा मुख्य मार्ग मानल्या जाणाऱ्या 'हॉर्मुझ सामुद्रधनी'त इराणने केलेल्या कडक नाकेबंदीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणच्या आक्रमक पवित्र्यामुळे सुमारे २०,००० खलाशी गेल्या अनेक दिवसांपासून भर समुद्रात अडकून पडले असून, त्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालानुसार, शेकडो मालवाहू जहाजे आणि तेलाचे महाकाय टँकर या सामुद्रधुनीत अडकले आहेत. इराणने गेल्या आठवड्यात दोन व्यापारी जहाजे बळजबरीने जप्त केली असून, काही जहाजांवर थेट गोळीबारही केला आहे. यात आतापर्यंत १० खलाशांचा बळी गेला असून, यामुळे इतर जहाजांच्या कॅप्टन्सनी पुढे जाण्यास नकार दिला आहे. 'लॉयड्स लिस्ट इंटेलिजन्स' या समुद्रसंबंधी डेटा देणाऱ्या कंपनीच्या अहवालानुसार, १३ ते १९ एप्रिल या कालावधीत या मार्गातून केवळ ८० जहाजे जाऊ शकली. युद्धापूर्वी याच मार्गावरून दिवसाला १३० हून अधिक जहाजांची ये-जा असायची. परिणामी, जहाजांची वर्दळ असणाऱ्या या मार्गावर आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

दरम्यान मंगळवारी जेद्दाह येथील गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलच्या बैठकीत होर्मुझची नाकेबंदी कशी फोडता येईल व व्यापारी जहाजांची वाहतूक कशी पूर्ववत होईल यावर बैठक झाली. सर्व सदस्यांनी हा मार्ग लवकर सुरू व्हावा म्हणून आग्रही मागणी केली आहे.

'आमच्या नाविकांचे प्राण धोक्यात!'
हॉर्मुझच्या सामुद्रधनीतील वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त करताना, भारताने हा व्यापारी मार्ग सुरक्षित आणि अडथळ्याविना त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. या महत्त्वाच्या जलमार्गाच्या नाकेबंदीचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे भारताने ठामपणे सांगितले. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रभारी राजदूत योजना पटेल यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीत व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याच्या कृत्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. 

ट्रम्प यांची आर्थिक कोंडी आणि इराणचा पलटवार
युद्धाला तात्पुरती स्थगिती दिली असली, तरी इराणच्या बंदरांवरील आर्थिक निर्बंध हटवण्यास अमेरिकेने स्पष्ट नकार दिला आहे. तर या 'आर्थिक युद्धा'ला प्रत्युत्तर म्हणून इराणने आमचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत, तर आम्ही जगाला तेल मिळू देणार नाही, अशी  भूमिका घेतली आहे.

पुतिन आणि अराघची यांच्यात २ तास खलबतं
इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची सेंट पीटर्सबर्ग येथे भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. या बैठकीत रशियाने इराणच्या जनतेच्या धैर्याचे कौतुक करत पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

Web Title : होर्मुज नाकेबंदी में नाविक फंसे, सहायता बाधित; ईरान-अमेरिका तनाव बढ़ा

Web Summary : ईरान की होर्मुज नाकेबंदी से 20,000 नाविक फंसे, व्यापार और सहायता बाधित हुई। जहाजों को जब्त किया गया। वैश्विक आर्थिक प्रभाव के साथ अंतर्राष्ट्रीय प्रयास समाधान चाहते हैं, भारत सुरक्षित मार्ग की वकालत कर रहा है और रूस ईरान का समर्थन कर रहा है।

Web Title : Hormuz Blockade Traps Sailors, Hinders Aid; Iran-US Tensions Rise

Web Summary : Iran's Hormuz blockade strands 20,000 sailors amid rising tensions. Vessels are seized, hindering trade and aid. International efforts seek resolution as global economic impact worsens, with India advocating for safe passage and Russia backing Iran.