शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Agarwood: हे आहे जगातील सर्वात दुर्मीळ लाकूड, ज्याच्यासमोर सोने, हिऱ्यांची किंमत काहीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 21:26 IST

Agarwood: सोने आणि हिऱ्यापेक्षाही एक लाकूड अधिक मौल्यवान आहे, असे सांगितले तर तुमचा क्षणभर त्यावर विश्वास बसणार नाही. जरी विश्वास बसत नसला तरी हे खरे आहे.

नवी दिल्ली - जर कुणाला विचारले की, जगातील सर्वात मौल्यवान वस्तू काय आहे, तर कुणीही हिरा किंवा सोने यांचंच नाव घेईल. मात्र सोने आणि हिऱ्यापेक्षाही एक लाकूड अधिक मौल्यवान आहे, असे सांगितले तर तुमचा क्षणभर त्यावर विश्वास बसणार नाही. जरी विश्वास बसत नसला तरी हे खरे आहे. जगातील या सर्वात दुर्मीळ लाकडाची किंमत ही हिरे आणि सोन्यापेक्षाही अधिक आहे. आज आपण त्या लाकडाबाबत जाणून घेऊयात. (Agarwood is the rarest wood in the world, with gold and diamonds costing nothing)

अकिलारियाच्या झाडापासून मिळणारे लाकूड अगरवूड, ईगलवूड किंवा एलोसवूड या नावाने ओळखले जाते. हे लाकूड चीन, जपान, भारत, अरबस्थान आणि दक्षिणपूर्वी आशियामध्ये सापडते. अगरवूडचे लाकूड हे जगातील सर्वात दुर्मीळ आणि सर्वात महागडे लाकूड आहे. या लाकडाची किंमत ही सोने आणि हिऱ्यापेक्षाही अधिक आहे. आताच्या घडीला भारतात एक ग्रॅम हिऱ्याची किंमत ३ लाख २५ हजार तर १० ग्रॅम सोन्याची किंमत ४७ हजार ६९५ रुपये आहे. मात्र अगरवूडच्या केवळ १ ग्रॅम लाकडाची किंमत ही १० हजार डॉलर म्हणजेच  ७ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

अगरवूड हे लाकूड जपानमध्ये क्यानम किंवा क्यारा या नावाने ओळखले जाते. या लाकडापासून अत्तर आणि परफ्युम बनवला जातो. लाकूड कुसल्यानंतर त्याचा वापर अत्तर बनवण्यासाठी केला जातो. एवढेच नाही तर अगरवूडच्या लाकडाच्या राळेपासून ओड तेलही मिळवले जाते. हे तेल सेंटमध्ये वापरले जाते. आजच्या घडीला या तेलाची किंमत २५ लाख रुपये प्रति किलो एवढी आहे. एवढे मौल्यवान असल्याने अगरवूडला वूड ऑफ गॉड्स म्हणजेच देवाचे लाकूड असे म्हणतात.

हाँगकाँग, चीन, जपानमध्ये अकिलारियाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात सापडतात. मात्र यामधून निघणारे अगरवूड एवढे मौल्यवान असल्याने या वृक्षांची तोड आणि तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे अकिलारियाच्या वृक्षांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. एका रिपोर्टनुसार एशियन प्लांटेशन कॅपिटल कंपनी अकिलारियाच्या वृक्षांशी संबंधित आशियामधील सर्वात मोठी कंपनी आहे. ती झाडांच्या प्रजाती वाचवण्याच्या कामामध्ये गुंतलेली आहे. तसेच या कंपनीने हाँगकाँगसह अनेक देशांत वृक्षारोपनाचे काम केले आहे. 

टॅग्स :forestजंगलInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके