शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या हॉकी संघाची घोषणा; फक्त एका गोलरक्षकाची निवड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 18:34 IST

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताने बुधवारी त्यांचा १६ सदस्यीय संघ जाहीर केला.

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताने बुधवारी त्यांचा १६ सदस्यीय संघ जाहीर केला. संघात पाच खेळाडूंना ऑलिम्पिक पदार्पणाची संधी दिली गेली आहे आणि संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंग करेल, तर हार्दिक सिंग उपकर्णधार असेल. हरमनप्रीतचे हे तिसरे ऑलिम्पिक आहे. या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंची सांगड घातली गेली आहे. टोक्यो २०२० आणि रिओ ऑलिम्पिक २०१६चा कर्णधार मनप्रीत सिंग आणि पीआर श्रीजेश हे संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहेत. कृष्णा बहादूर पाठकचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश आहे. भारताच्या मुख्य संघात श्रीजेश हा एकमेव गोलरक्षक आहे. 


जर्मनप्रीत सिंग, संजय, राजकुमार पाल, अभिषेक आणि सुखजीत सिंग हे या संघातून पदार्पण करणारे खेळाडू आहेत. संघ निवडीबद्दल बोलताना मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले, "पॅरिस ऑलिम्पिक संघाची निवड प्रक्रिया आमच्यासाठी किचकट होती, कारण आमच्याकडे प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. मला विश्वास आहे की निवडलेला प्रत्येक खेळाडू पॅरिसमध्ये त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन करेल. निवडलेल्या प्रत्येक खेळाडूने तयारीच्या टप्प्यात असाधारण कौशल्य, समर्पण आणि लवचिकता दाखवली आहे.


ते पुढे म्हणाले, "या संघात अनुभवी खेळाडू आणि आशादायक युवा प्रतिभांचा परिपूर्ण मिश्रण आहे, ज्यामुळे आम्हाला पुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक अष्टपैलुत्व आणि ऊर्जा मिळते.  आम्ही पॅरिसला जात असताना आमचे ध्येय स्पष्ट आहे.  आम्ही जगातील सर्वोत्कृष्ट संघांना सामोरे जाण्यासाठी आणि सर्वोच्च व्यासपीठासाठी प्रयत्न करण्यास तयार आहोत. हे पथक संधीचे सोने करण्यासाठी आणि गौरव करण्यासाठी सज्ज आहे. आम्हाला आमच्या क्षमतेवर विश्वास आहे आणि पुढच्या प्रवासासाठी आम्ही उत्सुक आहोत."


भारताला गतविजेत्या बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यासोबत गट ब मध्ये ठेवण्यात आले आहे. पूल अ मध्ये नेदरलँड्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, स्पेन, दक्षिण आफ्रिका आणि यजमान फ्रान्स यांचा समावेश आहे. उपांत्यपूर्व फेरीत जाण्यासाठी, संघाने त्यांच्या पूलमध्ये अव्वल चार स्थान मिळवणे आवश्यक आहे.

भारतीय संघ 

  • गोलरक्षक: श्रीजेश पीआर
  • बचावपटू: जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुमित, संजय
  • मिडफिल्डर: राजकुमार पाल, समशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, 
  • फॉरवर्ड: अभिषेक, सुखजीत सिंग, ललितकुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुरजंत सिंग
  • राखीव खेळाडू: नीलकांत शर्मा, जुगराज सिंग, कृष्ण पाठक
टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४IndiaभारतHockeyहॉकी