शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेचे सोन्याचे दागिने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST

हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील एक ४५ वर्षीय महिला गावाकडे सिरसमकडे आपल्या मुलासोबत ३० मार्च रोजी दुचाकीवर निघाली होती. त्यांची ...

हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील एक ४५ वर्षीय महिला गावाकडे सिरसमकडे आपल्या मुलासोबत ३० मार्च रोजी दुचाकीवर निघाली होती. त्यांची दुचाकी बासंबा फाटा परिसरात आली असता सदर महिला लघुशंकेसाठी दुचाकीवरून खाली उतरली. बाजूला अडोशाला जात असताना याच परिसरात दबा धरून बसलेल्या तिघांनी त्या महिलेला ओढत नेऊन तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटले. यावेळी महिलेने आरडाओरड केली असता तिच्या मुलाने धाव घेतली. त्यावेळी तिन्ही चोरट्यांनी दगडफेक करीत पळ काढला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वाखारे, स.पो.नि. राजेश मलपिलू यांनी घटनास्थळाकडे धाव घेत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली, तसेच याच परिसरात गस्तीवर असलेले हिंगोली ग्रामीणचे स.पो.नि. बी.आर. बंदखडके, अशोक धामणे, शे. महंमद, शेषराव पोले, पोकळे यांच्या पथकानेही धाव घेत आरोपींचा शोध सुरू केला. यावेळी बासंबा परिसरातील शेतात तिघे संशयित आढळून आले. पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची विचारपूस सुरू असल्याची माहिती स.पो.नि. राजेश मलपिल्लू यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत बासंबा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती.