लग्नसराईची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:18 IST2018-04-28T00:18:52+5:302018-04-28T00:18:52+5:30
सध्या लग्नसराईमुळे बसस्थानक व रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अपुऱ्या बसमुळे मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे खाजगी वाहनांची सध्या चंगळ सुरू असून दुप्पटीने प्रवासभाडे वसूल केले जात असल्याचे चित्र आहे.

लग्नसराईची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सध्या लग्नसराईमुळे बसस्थानक व रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अपुऱ्या बसमुळे मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे खाजगी वाहनांची सध्या चंगळ सुरू असून दुप्पटीने प्रवासभाडे वसूल केले जात असल्याचे चित्र आहे.
एप्रिल व मे महिन्यात लग्नसराईची मोठी धुमधाम असते. ऐन लग्नसराई त्यातच बसची अपुरी संख्या अन् रेल्वेतील प्रवाशांच्या गर्दीमुळे खाजगी वाहनातून प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत. भाडेही वाढविले जात आहेत. सकाळपासूनच बसस्थानक परिसर प्रवाशांच्या गर्दीने गजबजून जात आहे.