शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

चार गावांतील विहिरींची पाणी पातळी मोजण्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:28 IST

कळमनुरी : पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत तालुक्यातील चार गावांतील शेतातील विहिरींची पाणीपातळी ...

कळमनुरी : पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत तालुक्यातील चार गावांतील शेतातील विहिरींची पाणीपातळी मोजण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित १० गावांतील विहिरींच्या पाण्याची पातळी गावातील जलमित्रांमार्फत मोजली जाणार असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक भागवत कोटकर यांनी दिली.

कळमनुरी तालुक्‍यातील जरोडा, शिवनी खुर्द, मसोड, वारंगा मसाई या चार गावांतील माथा ते पायथापर्यंतच्या विहिरींच्या पाण्याची पातळी मोजण्याचे काम पूर्ण झाले आहे. एका वर्षातून चारवेळा विहिरींच्या पाण्याची पातळी गावातील जलमित्रांमार्फत मोजली जाणार आहे. गावातील पाण्याची पातळी किती प्रमाणात आहे, याची मोजणी केली जात आहे. त्यानंतरच जलव्यवस्थापनाचे नियोजन केले जाणार आहे. तालुक्यातील जरोडा, वारंगा तर्फ नांदापूर, रामवाडी, शिवनी खुर्द, नवखा, बोल्डावाडी, सिंदगी, कवडा, हिवरा तर्फ जवळा, भुरक्याची वाडी, नांदापूर, मसोड, चिंचोर्डी, सालेगाव या १४ गावांतील जलमित्रांना जल व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. कमी पावसामध्ये पीक नियोजन करून पाण्याची बचत कशा प्रकारे करायची व पाणी बचतीचे कोणकोणती साधने वापरायची, याकरिता विहिरींची पाण्याची पातळी मोजली जात आहे.

जलव्यवस्थापन हे प्रशिक्षण वेदांतु या ॲपवर ऑनलाईन घेण्यात आले. चौदा गावांमधून एकूण १५० जणांनी हे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर ११ डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत गावातील जलमित्रांनी विहिरीतील पाण्याची पातळी मोजण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण घेतले.