शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत पाणीटंचाईने घेतला बळी; पाणी आणण्यास गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा विहिरात बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 14:33 IST

Victims of water shortage in Hingoli मुलगा घरी पाणी नसल्याने गावाशेजारील हरी वसू यांच्या शेतातील ग्रामपंचायतच्या सार्वजनिक विहिरीवर पाण्यासाठी गेला होता.

हिंगाेली : पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका १३ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील माळहिवरा येथे १५ मार्च रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. पाणीटंचाईने जिल्ह्यातील पहिला बळी घेतला आहे.

राहुल वसंतराव भोसले (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. मृत राहुल भोसले हा घरी पाणी नसल्याने गावाशेजारील हरी वसू यांच्या शेतातील ग्रामपंचायतच्या सार्वजनिक विहिरीवर पाण्यासाठी गेला होता. सकाळी पाण्याच्या दोन खेपा घरी आणून टाकल्या होत्या. तिसऱ्या खेपेसाठी परत विहीरीवर गेला होता. मात्र यावेळी पाणी काढण्याची बकेट विहिरीतील आतील कठड्यावर पडली. याच वेळी कठड्यावर पडलेली बकेट काढत असताना त्याचा पाय घसरून तो विहिरीत पडला. यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पो.ह एस.पी. सांगळे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी वसंतराव भोसले यांच्या खबरीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. तपास एस.पी. सांगळे करीत आहेत. 

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोलीWaterपाणी