शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. याचा फटका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे. या संचारबंदीचा ट्रॅव्हल्स व्यवसायावरही परिणाम झाला असून, डिझेलचा खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. त्यातच ड्रायव्हर, क्लिनरच्या वेतनाचा खर्चही घरातूनच करावा लागत आहे. त्यामुळे हा व्यवसाय फार दिवस चालणार नसल्याच्या प्रतिक्रिया ट्रॅव्हल्स मालकांकडून व्यक्त होत आहेत.

मागील वर्षभरापासून कोरोनाने जिल्ह्यात शिरकाव केला आहे. लॉकडाऊनमुळे तर सर्व व्यवसायच कोलमडून गेले आहेत. मध्यंतरी कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्याने व्यवसाय स्थिरावतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पुन्हा कोरोना हातपाय पसरत असून, याचा फटका सर्वांनाच बसत आहे. यातून ट्रॅव्हल्स व्यवसायही सुटलेला नाही. अगोदरच डिझेलच्या दरात वाढ त्यातच कोरोनामुळे प्रवासी ट्रॅव्हल्सकडे फिरकत नसल्याने फेऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. यातून डिझेलचा खर्चही निघत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे निम्म्या ट्रॅव्हल्स जागेवरच उभ्या आहेत. कोरोनामुळे व्यवसायाला फटका बसला असताना शासनाने कोणत्याही करात सूट दिलेली नाही. त्यामुळे मासिक हप्ते कसे भरावेत, असा प्रश्न उभा राहात आहे. अशीच स्थिती राहिली तर हा व्यवसाय जास्त दिवस चालणार नसल्याच्या प्रतिक्रिया ट्रॅव्हल्स मालकांकडून व्यक्त होत आहेत.

कोरोनाआधी रोज बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या - १२

सध्याची संख्या - ५

गाडी रूळावर येत होती पण...

लॉकडाऊननंतर कोरोना रूग्णसंख्येत घट झाली होती. त्यामुळे शासनाने टप्प्याटप्प्याने विविध क्षेत्रांवरील बंदी उठवली होती. त्यामुळे ट्रॅव्हल्सच्या व्यवसायाने पुन्हा गती घेतली होती. मात्र, आता कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत. त्यामुळे पुन्हा हा व्यवसाय कोलमडला आहे.

प्रतिक्रिया...

कोरोनामुळे खासगी बस व्यवसायावर परिणाम झाला आहे. या व्यवसायातून डिझेल टाकायलाही ट्रॅव्हल्स मालकांकडे पैसे उरत नसल्याचे चित्र आहे. शिवाय मासिक हप्ता कसा भरायचा? असा प्रश्न पडतो. शासनानेही कोणत्याच करात सूट दिली नाही. ड्रायव्हर, क्लिनरच्या पगाराचाही प्रश्न असून, अशीच परिस्थिती राहिल्यास हा व्यवसाय संपल्यात जमा आहे.

- ललित खुराणा, ट्रॅव्हल्स मालक

कोरोनामुळे सध्या ट्रॅव्हल्सला प्रवासी मिळत नाहीत. त्यातच डिझेलचे दर वाढले आहेत. ट्रॅव्हल्स रिकाम्या धावत असून, हाती काहीच उरत नसल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे.

- विनोद भारूका, ट्रॅव्हल्स मालक