Torture on a minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
बासंबा : हिंगोली तालुक्यातील खेर्डा येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत आता बाललैंगिक अत्याचारासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा बासंबा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. आरोपीस अटक केली आहे.
खेर्डा येथील सदर मुलीला १७ सप्टेंबर रोजी गावातीलच शेख सोहेल याने पळवून नेले होते. याच दिवशी या मुलीच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार क.३६३ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या मुलीच्या शोधासाठी बासंबा पोलिसांनी पथके रवाना केली होती. ही मुलगी १९ सप्टेंबर रोजी आरोपीसह हिंगोलीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर दुपारी त्यांना बासंबा पोलीस ठाण्यात आणून तिच्या आई-वडिलांसमक्ष महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिचा जबाब घेतला. यानंतर मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली. त्यामुळे याबाबत पूर्वीच तक्रार दाखल असल्याने त्यात क.३७६, बालप्रतिबंधक कायद्यासह अ‍ॅट्रॉसिटीचे कलम वाढविण्यात आले आहे. यातील आरोपी शेख सोहेल यास अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी आर.आर. व्यंजने हे करीत आहेत.
वाहनांना दंड
हिंगोली - जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया तब्बल २0 वाहनांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या वाहनचालकांकडून ४३00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title:  Torture on a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.