व्याजाच्या पैशांवरून चाकूचा धाक दाखवून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST2021-04-03T04:26:05+5:302021-04-03T04:26:05+5:30

हिंगोली : भावाने व्याजाने घेतलेले पैसे का देत नाहीस, या कारणावरून चाकूचा धाक दाखवून एक लाख नऊ हजार रुपये ...

Robbed at gunpoint out of interest money | व्याजाच्या पैशांवरून चाकूचा धाक दाखवून लुटले

व्याजाच्या पैशांवरून चाकूचा धाक दाखवून लुटले

हिंगोली : भावाने व्याजाने घेतलेले पैसे का देत नाहीस, या कारणावरून चाकूचा धाक दाखवून एक लाख नऊ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याची घटना नरसी नामदेव येथे १ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नऊ जणांवर नरसी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत शिवाजी बाबाराव पातळे (रा. धनगरगल्ली, नरसी) यांनी फिर्याद दिली आहे. शिवाजी पातळे यांचा भाऊ शेषराव पातळे यांनी व्याजाने पैसे घेतल्याच्या कारणावरून नरसी येथील नऊ जणांनी घरात प्रवेश केला. शेषराव याने व्याजाने घेतलेले पैसे का देत नाहीस, असे म्हणून शिवाजी पातळे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य रस्त्यावर फेकून दिले. त्यानंतर, शिवाजी पातळे यांच्या भावजयीच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची १० ग्रॅम सोन्याची पोत, आईच्या गळ्यातील २२ हजार रुपये किमतीची सोन्याची गहू मण्यांची पोत, ५२ हजार रुपये किमतीचे ८० तोळे चांदीचे दागिने असा एकूण एक लाख नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाकूचा धाक दाखवून चोरून नेला. तसेच दरवाजा तोडून खिडकीच्या काचा फोडल्या. मोबाइलवरून जीवे मारण्याची धमकी देत जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शिवाजी पातळे यांच्या फिर्यादीवरून

अरुणा दिलीप काळे, अशोक कठाळू काळे, अशोक काळे यांची पत्नी, मंगळ पांडुरंग काळे यांची पत्नी, दत्ता रामजी पातळे, रामजी उकंडी पातळे, मंजुळा रामजी पातळे, दिलीप कठाळू काळे, मंगल पांडुरंग काळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, स.पो.नि. एस.एम. गिरी, सपोउपनि. पोटे, जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास स.पो.नि. एस.एम. गिरी करीत आहेत.

Web Title: Robbed at gunpoint out of interest money