विभागीय सहायक संचालकांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST2021-03-20T04:28:29+5:302021-03-20T04:28:29+5:30

१८ मार्च रोजी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी हिवताप डेंग्यू आजाराचा उद्रेक होऊ नये ...

Review conducted by the Divisional Assistant Director | विभागीय सहायक संचालकांनी घेतला आढावा

विभागीय सहायक संचालकांनी घेतला आढावा

१८ मार्च रोजी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी हिवताप डेंग्यू आजाराचा उद्रेक होऊ नये म्हणून वर्षातून अँबेटिंगचे सहा राऊंड घेण्यात येतात, तसेच नियमित कंटेनर सर्वेक्षण व अँबेटिग करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी दिली. यावेळी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गवळी, कीटक संहारक यू. टी. डाफणे, आनंद माखणे आदींची उपस्थिती होती. त्यानंतर १९ मार्च रोजी जवळा बाजार, हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना गप्पी मासे पैदास केंद्र तयार करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बल्फेवाड, डॉ. सिद्धीकी, डॉ. कोठुळे, आरोग्य पर्यवेक्षक बोरडे, सी.जी.रणविर, आरोग्य सहायक ठोंबरे, बी. एन. चट्टे, पवार, जी. डी. जाधव, साळवे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी रोहिणी उबाळे, मल्हारी चौफाडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, यावेळी आशा स्वयंसेविकांची बैठक घेऊन रक्त नमुनेबाबत आढावा घेण्यात आला.

फोटो २०

Web Title: Review conducted by the Divisional Assistant Director