शाळेसमोरील नाल्यावरील ढापे त्वरित दुरुस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:27 IST2021-02-12T04:27:57+5:302021-02-12T04:27:57+5:30

हिंगोली : शहरातील सरजुदेवी भिकुलाल भारूका आर्य कन्या शाळेसमोरील नालीवरील ढाप्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत ...

Repair the nala cover in front of the school immediately | शाळेसमोरील नाल्यावरील ढापे त्वरित दुरुस्त करा

शाळेसमोरील नाल्यावरील ढापे त्वरित दुरुस्त करा

हिंगोली : शहरातील सरजुदेवी भिकुलाल भारूका आर्य कन्या शाळेसमोरील नालीवरील ढाप्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत असून तुटलेले ढापे त्वरित दुरुस्त करावेत, अशा सूचना आ. संतोष बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शहरातील बसस्थानकासमोर दयानंद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित सरजुदेवी भिकुलाल भारूका आर्य कन्या शाळा आहे. शाळेसमोरील नालीवर ढापे टाकण्यात आले आहेत. मात्र, यातील काही ढापे तुटले आहेत. सध्या शाळा सुरू झाली असून विद्यार्थी शाळेत येत आहेत. या ढाप्यामध्ये विद्यार्थी पडून धोका निर्माण होऊ शकतो, याची कल्पना संस्था सचिव अनिलकुमार भारूका यांनी आमदार संतोष बांगर यांना दिली. आ. संतोष बांगर यांनी शाळेसमोरील तुटलेल्या ढाप्याची पाहणी केली. त्यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून ढाप्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या. यावेळी संस्था सचिव अनिलकुमार भारूका, प्राचार्या मंगला गायकवाड, मुख्याध्यापक एस.यू. सूर्यवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Repair the nala cover in front of the school immediately