शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बेस्ट सेवेसाठी चालक -वाहकांना पुन्हा बोलावणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST

हिंगोली : शासनाच्या आदेशाप्रमाणे बेस्ट (मुंबई) सेवेसाठी पुन्हा परभणी विभागांतर्गत असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील २६ चालक-वाहकांना बोलावणे आले असून ते ...

हिंगोली : शासनाच्या आदेशाप्रमाणे बेस्ट (मुंबई) सेवेसाठी पुन्हा परभणी विभागांतर्गत असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील २६ चालक-वाहकांना बोलावणे आले असून ते २७ मार्च रोजी रवाना झाले आहेत; परंतु कोरोनामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.

दोन महिन्यांपूर्वी परभणी विभागांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तीन आगारांतील चालक-वाहक यापूर्वीच जाऊन आले आहेत. यातील बहुतांश चालक-वाहक पॉझिटिव्ह आलेले आहेत. असे असताना मराठवाड्यातील इतर विभागाला वगळून पुन्हा एकदा परभणी विभागांतर्गत हिंगोली जिल्ह्याचाच क्रमांक काढला आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळाच्या चालक व वाहकांमध्ये नाराजी आहे.

स्वखुशीने बेस्टची सेवा करण्यासाठी नसून केवळ शासनाचा आदेश आहे, म्हणून आम्ही मुंबईला जात आहोत, अशी भावना चालक-वाहकांनी त्यावेळी बोलून दाखविली. जिल्ह्यातील हिंगोली ११, कळमनुरी ८ आणि वसमत आगारातून १४ चालक-वाहक बेस्टच्या सेवेसाठी गेले आहेत.

खरे पाहिले इतर विभागाच्या तुलनेत परभणी विभागाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्याही जास्तच आहे. दरवर्षी उत्पन्नाच्या बाबतीत परभणी विभाग सरस असतो. मुंबई (बेस्ट)ला जाण्यास काही हरकत नाही. याअगोदर कित्येकवेळा चालक-वाहक हे स्वखुशीने सेवा करण्यासाठी गेले आहेत; परंतु सद्य:स्थिती वेगळी आहे. कोरोना या महामारीमुळे आता पुन्हा जावे वाटत नाही.

...हा एक प्रकारे अन्यायच

मराठवाड्यातील काही विभागांनी अजूनही बेस्टची सेवा केली नाही. परभणी विभागांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली आगाराने याआधी बेस्टला सेवा दिली आहे. त्यावेळेस काही चालक-वाहक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दुसऱ्यांदा बोलावणे म्हणजे एक प्रकारे अन्यायच आहे. बेस्टच्या सेवेला जाण्यास कोणाचाही विरोध नाही; पण सर्वांना न्याय योग्य मिळावा, असे वाटते.

- डी. आर. दराडे, विभागीय सचिव, महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना