कळमनुरी तालुक्यातील घोडा येथे झन्नामन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घोडा येथील गजानन पतंगे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी १७ जण गोलाकार बसून जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या पथकाला आढळून आले. यावेळी पोलिसांनी जुगाऱ्यांकडून जुगाराचे साहित्य रोख १९ हजार ६०० रुपये व ८५ हजार रुपयांचे ८ मोबाइल असा एकूण १ लाख ४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते यांच्या फिर्यादीवरून बबन सटवा पाईकराव, चंद्रभान सिंग गुलाब सिंग रावत, दीपक सुदाम अंभोरे, प्रभाकर आंबा बुवा गुजर, ओमकार गंगाधर सावळे, राहुल काशिनाथ पाईकराव, राजू अशोक पाईकराव, जगदीश अर्जुन पाईकराव, प्रल्हाद शंकर पाईकराव, गजानन गोविंदराव पतंगे, ग्यानबा चांदू पाईकराव, राजू नागोराव पतिंगराव, सुमित साहेबराव पतंगे, संदीप परसराम खिलारे, गजानन बाबुराव पतंगे, शीलवान पंजाबराव पाईकराव, सुमित सुधाकर पतंगे यांच्याविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोह चव्हाण करीत आहेत.
घोडा येथील जुगार अड्ड्यावर छापा; १७ जुगारी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:27 AM