रामेश्वर तांडा येथे चार गावठी दारू अड्ड्यांवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:48 IST2021-05-05T04:48:59+5:302021-05-05T04:48:59+5:30

कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे गावठी दारू बनवून विक्री केली जात असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून ...

Raid on four village liquor dens at Rameshwar Tanda | रामेश्वर तांडा येथे चार गावठी दारू अड्ड्यांवर धाड

रामेश्वर तांडा येथे चार गावठी दारू अड्ड्यांवर धाड

कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे गावठी दारू बनवून विक्री केली जात असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून ४ मे रोजी सपोनि. रवी हुंडेकर, पो.उप.नि. हनमंत नकाते, पो.ना. नागोराव बाभळे, राजू जमदाडे, भारत डाखुरे, राजू जाधव, चालक पंडित बोदेमवाड, महिला पोलीस कर्मचारी जिजा गारोळे आदींच्या पथकाने रामेश्वर तांडा येथील गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला.

यावेळी बाळू उत्तम जाधव याच्याकडून २ हजार रुपये किमतीचे गावठी दारू बनविण्याचे सडके रसायन जप्त केले. त्यानंतर संदीप बाबूराव पवार याच्याकडून २ हजार रुपये किमतीची २० लिटर गावठी दारू, विजय माणिक जाधव याच्याकडून २ हजार ५०० रुपये किमतीचे गावठी दारू बनविण्याचे सडके रसायन, अभय राजेश जाधव याच्याकडून २ हजार रुपये किमतीची गावठी दारू पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दारू विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Raid on four village liquor dens at Rameshwar Tanda