पालकांनो, लहान मुलांना जपा; कोरोनाचा धोका वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST2021-04-04T04:30:36+5:302021-04-04T04:30:36+5:30

लहान मुलांनाही ताप, पेशी कमी होणे, डेंग्यूसदृश लक्षणे आढळत आहेत. आतापर्यंत मुलांना गंभीर त्रास नव्हता. आता काही रुग्णांत आढळत ...

Parents, take care of the little ones; The risk of corona is increasing | पालकांनो, लहान मुलांना जपा; कोरोनाचा धोका वाढतोय

पालकांनो, लहान मुलांना जपा; कोरोनाचा धोका वाढतोय

लहान मुलांनाही ताप, पेशी कमी होणे, डेंग्यूसदृश लक्षणे आढळत आहेत. आतापर्यंत मुलांना गंभीर त्रास नव्हता. आता काही रुग्णांत आढळत आहे. त्यामुळे पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

डॉ. गोपाल कदम, बालरोग तज्ज्ञ

सध्याच्या व्हायरसमुळे लहान मुले, तरुण यांनाही बाधा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या वयोगटानेही गर्दी करणे टाळून लक्षणे दिसताच चाचणी करून उपचार करणे गरजेचे आहे. यापूर्वी लहान मुले गंभीर होत नव्हती. आता गंभीर लक्षणे दिसू लागली आहेत.

डॉ. दीपक मोरे, बालरोग तज्ज्ञ

काय आहेत लक्षणे

लहान मुलांमध्ये नवीन व्हायरस स्ट्रेनमुळे जास्त ताप, पेशी कमी होणे, आदी डेंग्यूसदृश लक्षणे दिसू लागली आहेत. शिवाय एक ६ वर्षीय मुलगा घरी कोणीच बाधित नसताना बाधित असल्याची आढळली. त्यामुळे गर्दीत मुलांना पाठवू नये.

लहान मुलांना ताप, सर्दी, खोकला ही लक्षणेही बऱ्याच प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे अशांना तत्काळ वेगळे करावे. कारण ही मुले वृद्ध लोकांसोबत जास्त राहतात. त्यामुळे अशांना धोका पोहोचू शकतो.

लहान मुले, तरुणांतही हा आजार झपाट्याने पसरत असून, या लोकांनीही मास्कचा वापर करणे अनिवार्य बनले आहे. सामूहिक संसर्ग होत असल्याने ही काळजी महत्त्वाची आहे.

Web Title: Parents, take care of the little ones; The risk of corona is increasing