प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे शंभर टक्के उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST2021-04-02T04:31:10+5:302021-04-02T04:31:10+5:30

हिंगोली: माता व बालकांच्या सुरक्षेसाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनाचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. २४ ...

One hundred percent objective of Pradhan Mantri Matruvandana Yojana | प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे शंभर टक्के उद्दिष्ट

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे शंभर टक्के उद्दिष्ट

हिंगोली: माता व बालकांच्या सुरक्षेसाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनाचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. २४ हजार ४२४ महिला गरोदर व स्तनदा मातांची नोंदणी झाली आहे. त्यांच्या आधारलिंक खात्यात ९ कोटी २९ लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे.

गरोदर व स्तनदा मातांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यत काम करावे लागते, आर्थिक अडचणीमुळे प्रसूतीनंतर लगेच शारीरिक क्षमता नसताना सुद्धा अनेक मातांना कामावर जावे लागते. यामुळे अशा गरोदर व स्तनदा माता या अधिकाधिक कुपोषित होऊन तिच्या व नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृ्ष्टीने मातेस सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचेही आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंमालात आणण्यात आली आहे. महिलांच्या आधारलिंक खात्यात तीन टप्प्यामध्ये पाच रुपये अदा केले जाते. तसेच जननी सुरक्षा योजनेचा अतिरिक्त लाभ असे एकंदरीत ५ हजार ७०० रुपये लाभार्थ्यांना मिळतात.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत जिल्ह्याकरीता राज्यस्तरावरुन २४ हजार ४४४ उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २४ हजार ४६४ गरोदर महिला व स्तनदा मातांची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार व सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी योजनेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Web Title: One hundred percent objective of Pradhan Mantri Matruvandana Yojana