आरक्षण संपविण्याचा मोदी सरकारचा डाव : प्रा. भानुदास माळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:00+5:302021-07-07T04:37:00+5:30

येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात ६ जुलै रोजी ओबीसी विभागाची कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली. यावेळी स्व. खा. राजीव सातव ...

Modi government's move to end reservation: Pvt. Bhanudas Mali | आरक्षण संपविण्याचा मोदी सरकारचा डाव : प्रा. भानुदास माळी

आरक्षण संपविण्याचा मोदी सरकारचा डाव : प्रा. भानुदास माळी

येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात ६ जुलै रोजी ओबीसी विभागाची कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली. यावेळी स्व. खा. राजीव सातव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. संतोष टारफे, तर अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, भगवान कोलेकर, संतोष रसाळकर, जि. प. सदस्य दिलीप देसाई, बाबा नाईक, तालुकाध्यक्ष विनायकराव देशमुख, बापुराव बांगर, शामराव जगताप, न. प. गटनेते शेख नेहाल, सतीश पाचपुते, भगवान खंदारे, रमेश जाधव, अनिल नेनवाणी, विलास गोरे, आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रा. माळी म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारची भूमिका खोटे बोल पण रेटून बोल, अशी आहे. केंद्र सरकारच्या विरोधात दिल्ली येथे आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी समाज बांधवांना न्याय मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी केले.

Web Title: Modi government's move to end reservation: Pvt. Bhanudas Mali