शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कुटुंब नियोजनाकडे पुरूषांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST

हिंगोली: नसबंदी केल्याने पौरुषत्वावर परिणाम होतो, अशा भ्रामक समजुती पाळल्या जात असल्याने पुरूषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकडे पाठ फिरविल्याचे चित्र ...

हिंगोली: नसबंदी केल्याने पौरुषत्वावर परिणाम होतो, अशा भ्रामक समजुती पाळल्या जात असल्याने पुरूषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकडे पाठ फिरविल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. आरोग्य विभागाला ७०८ पुरूष शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. मात्र आतापर्यंत एकही पुरूष शस्त्रक्रिया झाली नसल्याचे समोर आले आहे. तर चालू वर्षात आतापर्यंत २ हजार ६९६ महिलांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या आहेत.

कुटुंब नियोजनासाठी शासनातर्फे दरवर्षी मोहीम राबवण्यात येते. यासाठी उद्दिष्टही ठरवले जाते. तसेच शासनातर्फे शस्त्रक्रिया करणाऱ्यांना अनुदानही दिले जाते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांना शासनातर्फे ६०० रूपये तर इतर महिलांना २५० रूपये अनुदान दिले जाते. तर पुरूषांना नसबंदीच्या शस्त्रक्रियेसाठी १ हजार १०० रूपये मिळतात. स्त्रिया आणि पुरुषांच्या नसबंदीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जनजागृतीही करण्यात येते. मात्र, असे असतानाही महिलांच्या तुलनेत मोजकेच पुरुष शस्त्रक्रिया करत असल्याचे वास्तव आहे. चालू वर्षभरात तर जिल्ह्यात एकाही पुरूषाने शस्त्रक्रिया केली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे कुटुंब नियोजनाचा भार महिलांवरच आहे.

जिल्ह्यात चालू वर्षात एकूण शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ८ हजार ५०७ आहे. त्यापैकी आतापर्यंत २ हजार ६९६ शस्त्रक्रिया पार पडल्या. यात पुरूष शस्त्रक्रियेचा वाटा काडीचाही नसून सर्व शस्त्रक्रिया महिलांच्याच आहेत. यात जिल्हा आरोग्य विभागाला ५ हजार ६९२ चे उद्दिष्ट स्त्री शस्त्रक्रियांचे देण्यात आले होते. त्यापैकी १ हजार २५७ शस्त्रक्रिया पार पडल्या. यातील ३२५ शस्त्रक्रिया ह्या फेब्रुवारी महिन्यातील आहेत. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास २ हजार १०७ चे स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत १ हजार ४३९ चे उद्दिष्ट पार केले आहे. पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे जिल्हा आरोग्य विभागाला ५१७ चे तर जिल्हा शल्य चिकित्सक विभागाला १९१ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र एकाही विभागाला या शस्त्रक्रियेची सुरुवात करता आली नाही. त्यामुळे कुटुंब नियोजनाचा भार महिलांवरच असल्याचे दिसून येत आहे.