शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनातच मक्याला फुटले कोंब; १३० वाहने ७ दिवसांपासून केंद्राच्या परिसरात उभी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 14:04 IST

संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून रस्ता रोको आंदोलन केले. तरी काही उपयोग झाला नाही.

ठळक मुद्देवाहनांना दिवसाकाठी पाच हजार रूपये भाडेभाड्याव्यतिरिक्त एक हजार रूपयांची खुंटी ३० जुलै रोजी दुपारीच खरेदी बंद करण्यात आली.

- फकिरा देशमुख । 

भोकरदन (जि. जालना) : बंद पडलेले मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू होईल, या आशेवर शेतकऱ्यांचा मका असलेली तब्बल १३० वाहने केंद्राच्या परिसरात उभी आहेत. विशेष म्हणजे गत सात दिवसांपासून उभ्या असलेल्या या मक्याला आता पोत्यातच कोंब फुटू लागले आहेत. काहींनी किरायाने खोली घेऊन त्यात मक्याची साठवणूक केली आहे. अद्यापही तब्बल २० हजार क्विंटल मक्याची खरेदी होणे बाकी असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

बाजार पेठेत मका चक्क १ हजार ते १२०० या भावाने खरेदी करण्यात आला. हमी भाव १७६० रूपये देऊन केंद्र व राज्य सरकारने मका खरेदीसाठी जुलै महिन्यात सुरू केली. मात्र पंधरा दिवसात बंद ती बंद करण्यात आली. त्यानंतर २४ जुलै रोजी परत मका खरेदी सुरू केली व ३० जुलै रोजी बंद केली. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. कारण शेतकऱ्यांनी मका विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ‘मका खरेदी केंद्रावर घेऊन या’ अशा आशयाचे ‘एसएमएस’ पाठविण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी २४ जुलै पासून एक हजारापेक्षा जास्त वाहने खरेदी केंद्रावर आणली. काही वाहनातील मका खरेदी झाला. मात्र, ३० जुलै रोजी दुपारीच खरेदी बंद करण्यात आली.

संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून रस्ता रोको आंदोलन केले. तरी काही उपयोग झाला नाही. सध्या पोत्यातील मक्यालाही कोंब फुटत असल्याने नुकसान होत आहे.  वाहनांना दिवसाकाठी पाच हजार रूपये भाडे व भाड्याव्यतिरिक्त एक हजार रूपयांची खुंटी लागत आहे. त्यामुळे ७ हजाराचा भुर्दंड बसत आहे.

३१ हजार ५७६ क्विंटल मका खरेदीशासनाने ३० जुलै रोजी मका खरेदी बंद केली. त्यावेळी तालुक्यातील ३१० वाहने केंद्राबाहेर उभा होती. आजवर ३१ हजार ५७६ क्विंटल मका खरेदी करण्यात आला असून, ३४ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. शासनाने परवानगी दिली तर राहिलेल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी केला जाईल.- शौकत अली, व्यवस्थापक, मोरेश्वर खरेदी विक्री संघ

प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.शासनाने मका खरेदीला परवानगी दिली तर शेतकऱ्यांची मका प्राधान्याने खरेदी करता येणार आहे. परवानगी वाढवून मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.- संतोष गोरड, तहसीलदार, भोकरदन

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र