शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा भरपूर आमरस; केशर १०० रूपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : कोरोना प्रतिबंधामुळे यावर्षी आंब्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. मात्र, विक्रीसाठी दिवसाआड दुपारपर्यंतच मुभा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हिंगोली : कोरोना प्रतिबंधामुळे यावर्षी आंब्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. मात्र, विक्रीसाठी दिवसाआड दुपारपर्यंतच मुभा देण्यात आल्याने ग्राहकांची संख्या रोडावली आहे. गावरान आंबा अद्याप बाजारात दाखल झालेला नाही. त्यामुळे सध्या दशहरी, केशर आंब्याला मागणी होत आहे.

जिल्ह्यात यावर्षी गावरान आंब्याच्या उत्पादनाची आशा शेतकऱ्यांना होती. झाडाला कैऱ्याही लगडल्या होत्या. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडाखाली कैऱ्यांचा सडा पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या गावरान आंबे बाजारात दाखल झाले नसले, तरी दशहरी, केशर, लालबाग, बादाम, पायरी आदी प्रकारचे आंबे विक्रीला येत आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी आंब्याची आवक वाढल्याने दरही घसरले आहेत. गतवर्षी १८० रूपये प्रतिकिलो दराने विक्री होणारा आंबा यावर्षी ६० ते ७० रूपये किलो दराने मिळत आहे. त्यामुळे यंदा आंब्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांतून आंबे दाखल होत असून, ठिकठिकाणी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. मात्र कोरोना निर्बंधाचा फटका बसत असल्याने विक्रेतेही त्रस्त झाले आहेत.

आवक वाढली, ग्राहक रोडावले

जिल्ह्यात यावर्षी गावरान आंब्याचे उत्पादन चांगले होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. सध्या आखणी गावरान आंबे म्हणावे तेवढे बाजारात आले नसले तरी इतर राज्यांतून येणाऱ्या आंब्याची आवक वाढली आहे. शहरातील प्रमुख चौक, मार्गावर ठिकठिकाणी आंब्याची दुकाने थाटली आहेत. मात्र, कोरोनामुळे निर्बंध घालण्यात आल्याने विक्रेत्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. ग्राहक मिळत नसल्याने एकदा घेतलेला माल दोन ते तीन दिवस विक्री करावा लागत असल्याचे विक्रेते सांगत आहेत.

प्रतिक्रिया...

यावर्षी गावरान आंबे चांगले आले आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याने कैऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही उत्पादन वाढणार असल्याने आंब्याच्या दरात घसरण झाली आहे.

- सदाशिव थोरात (शेतकरी)

गावरान आंब्याला बाजारात मोठी मागणी आहे. मात्र, अद्याप आंबा विक्रीसाठी आला नाही. सध्या बाजारपेठेतील आंब्याची आवक लक्षात घेता, गावरान आंब्याचे दर कमी होण्याची भीती आहे.

- विनायक जोजार (शेतकरी)

कोरोनामुळे फळ विक्रीला दिवसाआड परवानगी दिली आहे. मालाची आवक जास्त असली तरी कोरोनामुळे ग्राहक फिरकत नाहीत. त्यामुळे एकदा घेतलेला माल दोन ते तीन दिवस विक्री करावा लागत आहे.

- महंमद फेरोज (आंबे विक्रेता)

कोरोनामुळे निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा फटका आंबे विक्रेत्यांना बसत आहे. त्यात दुपारी १ वाजेपर्यंतच विक्री करावी लागत असल्याने व्यवसायावर परिणाम होत आहे.

- नईम बागवान (आंबे विक्रेता)

कुठल्या आंब्याला काय दर (प्रति किलो)

प्रकार रिटेल होलसेल

हापूस (कर्नाटक) १५० १४०

केशर - १०० ८०

दशहरी ८० ७०

लालबाग ५० ४०

बादाम ६० ५०

लंगडा ८० ७०

पायरी १०० ८०

गावरान ८० ७०