शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

जीपला अपघात; १0 भाविक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:21 IST

हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर शासकीय विश्रामगृहाजवळ जीप व कंटनेरची ४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान समोरासमोर धडक होवून १० जण जखमी झाल्याची घटना घडली. जीपमधील भाविक दर्शनासाठी पुसद तालुक्यातील कारला येथे जात होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर शासकीय विश्रामगृहाजवळ जीप व कंटनेरची ४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान समोरासमोर धडक होवून १० जण जखमी झाल्याची घटना घडली. जीपमधील भाविक दर्शनासाठी पुसद तालुक्यातील कारला येथे जात होते. अपघातातील तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.जीप क्र. एम.एच.२२ के. ३१३१ ही हट्टा येथून कारला येथे दर्शनासाठी १० जण जात होते. तर नांदेडहून हिंगोलीकडे जाणारा कंटनेर क्र. एन.एल ०१- एए ९३०१ या दोन वाहनाची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये तुकाराम जाधव (६०), लक्ष्मीबाई जाधव (६५), मनकर्निका जाधव, शिवम जाधव, शिवराज जाधव, सरस्वती जाधव सर्व रा. सोन्ना, ता. वसमत तसेच प्रल्हाद भवर, प्रतिभा भवर, सत्यभामा भवर (तिघे रा. हट्टा), गोकर्णा जाधव (६०, रा.सोन्ना) हे जखमी झाले आहेत. यातील तुकाराम जाधव, लक्ष्मीबाई जाधव, प्रल्हाद भवर हे तिघे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथे पाठविण्यात आले. जखमींवर डॉ. आनंद मेने, डॉ. महेश पंचलिंगे, डॉ.सोफीया खान, सीमा सोनवणे, संध्या मोरे यांनी उपचार केले. बोलेरोमधील १० जण दर्शनासाठी पुसद तालुक्यातील कारला येथे जात होते.अपघात घडताच अमोल कांबळे, लखन पर्वत, अनिल इंगळे, प्रथम रिठ्ठे, कृष्णा कºहाळे, स्वप्नील खोकले, स्वप्नील भगत यांनी जखमींना आॅटोमध्ये टाकून ग्रामीण रूग्णालयात आणले. या अपघातात जीपचा समोरील भाग चक्काचूर झाला असून कंटनेरच्या डिझेलची टाकी फुटली आहे. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. कंटनेरच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसAccidentअपघात