हिंगाेलीत काेराेनाचा वाढता संसर्ग ; अनेक नगरांत काेराेना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:45 IST2021-02-23T04:45:51+5:302021-02-23T04:45:51+5:30

हिंगाेली : जिल्ह्यात पुन्हा काेराेनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे मागील चार दिवसांत ५० च्या जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. ...

Increasing infection of carina in Hingali; Carina testing in several cities | हिंगाेलीत काेराेनाचा वाढता संसर्ग ; अनेक नगरांत काेराेना चाचणी

हिंगाेलीत काेराेनाचा वाढता संसर्ग ; अनेक नगरांत काेराेना चाचणी

हिंगाेली : जिल्ह्यात पुन्हा काेराेनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे मागील चार दिवसांत ५० च्या जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे ग्रामीण भागापेक्षा शहरात काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अनेक नगरांत प्रशासनाच्या वतीने काेराेना चाचणी करण्यात येत आहे.

हिंगाेली शहरातील शास्रीनगर भागात कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे या भागात बॅरिकेड्स लावून हा भाग प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. या भागात नागरिकांची तसेच संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येत आहे. नगरपालिकेच्या वतीने पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, या पथकांकडून काेराेना नियम पाळण्यासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरात संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र यासंदर्भात नागरिकांकडून ना मास्क, ना सॅनिटायझर, सामाजिक अंतर पाळण्यास विसर पडला आहे. यामुळे धोका वाढत आहे. प्रशासनाकडून उपाययाेजना करण्यात येत असल्या तरी नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. हिंगाेली शहरात अनेक ठिकाणी रुग्ण आढळून आल्याने शास्रीनगर, श्रीनगर, बियाणी नगर यासह इतरही भागात काेराेना तपासणी करण्यात येत आहे. याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, कनिष्ठ अभियंता तसनीम सनोबर, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. फाेटाे नं.०१ व ०२

Web Title: Increasing infection of carina in Hingali; Carina testing in several cities