शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मानवांनो नुसते पाणवठे तयार करू नका; त्यात पाणीही टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:31 IST

हिंगोली : मनुष्य हा प्राणीमात्रावर दया करणारा समाजशील आहे. परंतु आज २३ दिवस झाले आहेत, आमच्यासाठी तयार केलेल्या पाणवठ्यात ...

हिंगोली : मनुष्य हा प्राणीमात्रावर दया करणारा समाजशील आहे. परंतु आज २३ दिवस झाले आहेत, आमच्यासाठी तयार केलेल्या पाणवठ्यात कोणी थेंबभर पाणी टाकायलाही तयार नाही, असा सवाल पक्ष्यांनी उपस्थित केला आहे.

नगरपालिकेच्या वतीने वृक्षांवर मोठ्या प्रमाणात फोटोसेशन करून १ मार्च रोजी पाणवठे उभारले. शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेले पाणवठे बांधले. या पाणवठ्यात जेमतेम दोन- तीन दिवस पाणी टाकले. नंतर मात्र याकडे कोणी पाहायलाही तयार नाही. आजमितीस २३ दिवस झाले आहेत. मोठ्या आशेने पक्षी मंडळी पाणवठ्याजवळ येत आहोत. परंतु त्यात पाणीच नसल्याने येेथे आलेल्या पक्ष्यांना पाण्याच्या शोधात इतरत्र उडून जावे लागते. सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जीव कासावीस होत आहे. शहरातील झाडांवर आता नुसतेच काेरडे पाणवठे दिसून येत आहेत. झाडाला बांधलेल्या पाणवठ्यात ना दाणा, ना पाणी. केवळ पाणवठे शोभेच्या वस्तू झाल्या आहेत. पाणवठ्यात पाणी टाकण्याचा संकल्प करणे सोपे असते. परंतु तो पूर्ण करणे तेवढेचं जिकरीचे असते. यामुळे काही दिवस पाण्याची साेय केलेल्यां पक्ष्यांना परत दाणा, पाणी आहे की नाही, याची काेणालाही गरज नसल्याचे दिसून येतेे.

वाटसरुला आली दया...

नगर परिषदेच्या रोपवाटिकेने टाकाऊ वस्तूंपासून पाणवठे तयार केले. शहरातील रस्त्याच्या कडेला झाडावर पाणवठे बांधले आहेत. २१ मार्च रोजी टेलर शेख नईम नामक वाटसरु जात असताना, झाडांवर बांधलेले पाणवठे कोरडेठाक असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्याकडील पिण्याच्या बाटलीतील पाणी झाडांवर बांधलेल्या चार ते पाच पाणवठ्यात टाकून पक्ष्यांवरील प्रेम व्यक्त केले.

फाेटाे नं. ०१