शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Hingoli: स्वस्त सोन्याचा मोह नडला! व्यापाऱ्याचे १५ लाख गेले, १ किलो बनावट सोनं पदरी पडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:01 IST

नांदेडच्या व्यापाऱ्याची वसमत येथे बोलावून फसवणूक; दोन पुरुषासह एका महिलेवर गुन्हा दाखल 

- इस्माईल जहागीरदारवसमत  (जि. हिंगोली)  : नांदेड येथील व्यापाऱ्यास गाठून एका युवकाने ‘आम्हाला खोदकाम करताना सोने सापडले ते विकण्यासाठी आमची मदत करा,’ असे बोलून त्यांना सोन्याचे चार मणी खात्री करण्यासाठी दिले. त्यानंतर काही दिवसांनी वसमत येथे व्यापाऱ्यास बोलावून बनावट सोन्याचा २० पदरी हार १५ लाख रुपये घेऊन दिला. तो हार बनावट सोन्याचा असल्याचे कळाल्यानंतर व्यापाऱ्याने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी दोन पुरुषासह एका महिलेवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

नांदेड येथील व्यापारी संतोष लक्ष्मण बेलापुरे (वय ४७, रा. बेळकोणी (बु) ता. बिलोली. जि नांदेड) यांचे शास्त्रीनगर नांदेड येथे दुकान आहे. २२ एप्रिल रोजी एक युवक त्यांच्याकडे आला होता. ‘आम्हाला खोदकाम करताना सोने सापडले आहे ते सोने विकण्यासाठी आम्हाला मदत हवी आहे,’ असे म्हणत त्यांना सोन्याचे चार मणी खात्री करण्यासाठी दिले.ते सोन्याचे चार मणी खरे आसल्याची खात्री झाली त्यामुळे व्यापार्याला सोन्याचा आला, त्यानंतर काही दिवसानंतर तिघांनी बेलापुरे यांना वसमत शहरातील आसेगाव कॉर्नर येथे बोलावले. बनावट २० पदरीहारासाठी त्यांच्यात १५ लाख रुपयात बोलणी झाली. बेलापुरे यांनी १५ लाख रुपये त्या तिघांना देत निघून गेले. 

हा सर्व प्रकार २२ एप्रिल ते ९ मे दरम्यान घडला. काही दिवसांनंतर बेलापुरे यांना त्या हाराबद्दल संशय आला आणि त्यांनी तो हार पाण्यात घातला असता तो काळा पडला.तो हार सोन्याचा नसल्याचे कळताच बेलापुरे यांनी नांदेड येथील पोलिसांकडे अनोळखी तिघांनी फसवणूक केल्याची तक्रार दिली. घटनास्थळ वसमत येथील असल्याने तो गुन्हा शहर पोलिस ठाण्यात १९ जून रोजी रात्री वर्ग करण्यात आला. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, फौजदार बोंडले, इम्रान कादरी, गजानन भोपे  हे करीत आहेत.

त्या अनोळखी तिघांचा शोध सुरू....नांदेड येथील व्यापाऱ्यास एक किलोचे बनावट सोन्याचे २० पदरीहार देणाऱ्या तिघांपैकी एकाचा पोलिसाजवळ मोबाईल नंबर आहे. त्यानुसार पोलिस तपास करत आहेत. ते अनोळखी तिघेजण वसमत शहरातील नसून बाहेरील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीfraudधोकेबाजी