शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून कोरोना रुग्णांवर केला जातो लाखो रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:30 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. नागरिकांची काळजी घेत शासन आज घडीला रुग्णांवर लाखो रुपये खर्च ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. नागरिकांची काळजी घेत शासन आज घडीला रुग्णांवर लाखो रुपये खर्च करत असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातून सांगण्यात आले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज अँटीजेन व आरटीपीसीआर दोन्ही मिळून १,००० चाचण्या होत आहेत. त्यातून कोरोना बाधित रुग्णांची माहिती समोर येत आहे. आज मितीस तरी जिल्ह्यात एकही खासगी प्रयोगशाळा अस्तित्वात नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात निदान करण्यासाठी प्रयोगशाळा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वच कोरोना रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयातच इलाज केला जातो.

मार्च २०२० मध्ये कोरोनाने सर्वत्र डोके वर काढले. एप्रिल २०२० मध्ये १ तारखेला पहिला रुग्ण आढळून आला. शासनाच्या वतीने कोरोना चाचण्यांवर हिंगोलीकरांसाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. कोरोना रुग्णांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून शासनाने हिंगोलीकरांसाठी २ कोटी १२ लाखांची मशीन जिल्हा सामान्य रुग्णालयाने बसविली आहे. सुरुवातीला एका चाचणीला १,२६७ रुपये खर्च येत असे. आज घडीला ७५० रुपये खर्च येतो असून सर्व खर्च शासन करत आहे.

फेब्रुवारी २०२१ पासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन या ठिकाणी अँटीजेन चाचणी तर अण्णाभाऊ साठे वाचनालय येथे अँटीजेन व आरटीपीसीआर चाचणी घेण्यात येत आहे. तपासणीच्या ठिकाणी कोणी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला तर त्यास कोरोना सेंटरमध्ये पाठविले जात आहे. अतिगंभीर असेल तर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये भरती केले जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करुनही अनेक जण अजूनही कोरोना चाचण्या करुन घेण्याकडे बारकाईने लक्ष देत नसल्याचे समोर येत आहे.

प्रयोगशाळा एक

जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनासाठी एक प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. खासगी प्रयोगशाळा सध्या तरी कुठेही अस्तित्वात नाही, असे जिल्हा सामान्य रुग्णालयातून सांगण्यात आले.

रोज घेतल्या जातात १,००० चाचण्या

कोरोनाची चाचणी नाही म्हटले तरी १,००० जवळपास केली जात आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा सामान्य रुग्णालय सर्वतोपरी सहकार्य नागरिकांना करत आहे. परंतु, नागरिक मात्र कोरोनाकडे डोळेझाक करताना दिसून येत आहेत.

गत आठवड्यात झाल्या ७,००० हजार चाचण्या

अँटीजेन व आरटीपीसीआर अशा दोन्ही मिळून १ हजार चाचण्या रोज केल्या जातात. गत आठवड्यात ७ हजार चाचण्या झालेल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टर यासाठी सहकार्य करताना दिसून येत आहे.