आदिवासी उपयोजनेतील निधी प्रकल्प कार्यालयात अडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:37 AM2021-02-25T04:37:24+5:302021-02-25T04:37:24+5:30

यावेळी काही सदस्यांनी आदिवासी उपयोजनेतील गतवर्षीचा निधी आदिवासी प्रकल्प कार्यालयाने अडवून धरल्याने जिल्हा परिषदेकडून त्यासाठी पाठपुरावा झाला की नाही, ...

Funds from the tribal sub-plan stalled at the project office | आदिवासी उपयोजनेतील निधी प्रकल्प कार्यालयात अडला

आदिवासी उपयोजनेतील निधी प्रकल्प कार्यालयात अडला

Next

यावेळी काही सदस्यांनी आदिवासी उपयोजनेतील गतवर्षीचा निधी आदिवासी प्रकल्प कार्यालयाने अडवून धरल्याने जिल्हा परिषदेकडून त्यासाठी पाठपुरावा झाला की नाही, याची विचारणा केली. त्यानंतर अनेकदा पत्र दिल्याचे समोर आले. त्यामुळे जाणीवपूर्वक हे कार्यालय आदिवासी भागाच्या विकासाचा निधी न देऊन त्यांच्यावर अन्याय करीत असेल तर संबंधितांना या बैठकीला बोलावा, असे सुचविले. त्यानंतरही जर ते ऐकत नसतील तर ही बाब गंभीर असून जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून द्यावा, असेही सांगण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेतील निधी देण्यासाठी यापूर्वी कधी टाळाटाळ होत नव्हती. आताच हे होण्यामागचा हेतू चांगला नसल्याचाही आरोप सदस्यांनी केला असून प्रसंगी पालकमंत्र्यांकडेही याबाबत तक्रार करण्याचा सूर आळवला जात होता.

यामध्ये यात डिग्गी ते सालवाडी ३.९६ लाख, खापरखेडा ते गौळ बाजार ९.९९ लक्ष, बेलथर ते वंजारवाडी १४.९७ लाख, पाळोदी ते गिरामवाडी २१ लाख, जलालधाबा ते तामटी १० लाख, वाळकी ते असोला त. १५ लाख, डिग्गी ते सालवाडी ३६ लाख, वारंगा फाटा ४५ लाख अशी कामे मंजूर झाली होती. यापैकी एक वगळता इतर सर्व कामे पूर्ण झाली.

Web Title: Funds from the tribal sub-plan stalled at the project office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.