शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 19:35 IST

नववीत शिकणाऱ्या अक्षराने दाखवली जबाबदारीची परिपक्वता; मुलीच्या कष्टांनी शेतकरी वडिलांना मिळाला दिलासा

- दिलीप कावरखेगोरेगाव  (जि. हिंगोली) : ‘मुलगा वंशाचा दिवा आणि मुलगी परक्याचे धन’ असे म्हटले जाते. पण, या बुरसट वाक्प्रचाराला बाजूला सारून अक्षराने एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन एकरांत सोयाबीन लागवड करून दाखवत शेतकरी वडिलाला मोठा आधार दिला. यामुळे मुलीही काही कमी नसतात, हे यातून स्पष्ट होते.

काळ बदलला असल्यामुळे आता आधुनिक पद्धत समोर आली असून, बहुतांश शेतकरी यंत्राच्या साह्याने शेती करू लागला आहे. सद्य:स्थितीत खरीप हंगाम सुरू असून, पेरणीची लगबग सुरू आहे. परंतु, अशा लगबगीत आपले कसे होईल?, सोयाबीन लागवड वेळेवर होईल का?, मजूर मिळतील का?, मिळाले तर किती मजुरी मागतील?, असे एक ना अनेक प्रश्न शेतकरी अंकुश खिल्लारी यांना सतावत होते. अशावेळी मुलगी अक्षराला वडिलाच्या कपाळावर चिंतेच्या रेषा दिसल्या. यावेळी तिने बाबा चिंता कशाला करता?, असे म्हणत टोकणयंत्राचे एक टोक स्वतःच्या हाती घेत एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन एकरांत सोयाबीन लागवड करून दाखवत शेतकरी बापाला मोठा आधार दिला. आपल्या मुलीचा पराक्रम पाहून कपाळावर उमटलेल्या चिंतेच्या रेषा काही क्षणांतच गायब झाल्या.

माशांना पोहणे शिकवायचे नसते...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन पेरणीसाठी ट्रॅक्टरची मजुरीचा खर्च, खत, बियाणे जास्त लागतात. त्यामुळे खर्चही वाढत जातो. याउलट गादीवाफा (बेड) जोडवळ पद्धतीने टोकण केल्यास ट्रॅक्टर मजुरी व खत बियाणांच्या खर्चात मोठी बचत होते. दुसरीकडे उत्पन्नही वाढून मिळते. पाण्याचा निचरा होत असल्याने अतिवृष्टी, सतत पावसामुळे पिकाची नासाडी होत नाही. त्यामुळे सध्या बरेच शेतकरी टोकण पद्धतीने सोयाबीन लागवडीवर भर देत आहेत. हे इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अक्षरा खिल्लारी हिला ज्ञात असल्याने तिने आपल्या कष्टकरी शेतकरी वडिलाला मदत करण्याचे ठरविले आणि मुलगीही कमी नाही हे दाखवून दिले.

पाच तासांत तीन एकर सोयाबीन लागवड...वडिलांना बेडवर टोकणयंत्र धरले तर समोर बांधण्यात आलेली काढीची एक बाजू हातामध्ये धरून अक्षराने एका शेतमजुरासोबत टोकणयंत्र ओढणे सुरू केले. सकाळी साडेअकरा वाजेपासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत पाच तासांमध्ये तीन एकरांवर सोयाबीनची लागवड केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र