शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने दहा गुंठ्यांत फुलवली गुलाबशेती; दोन लाखांचे मिळते उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 20:00 IST

पारंपरिक शेतीला मिळवला चांगला पर्याय

- गंगाधर भोसले

वसमत : तालुक्यातील पांगरा बोखारे येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने गेल्या सात वर्षांपासून शेतीला जोडव्यवसाय म्हणून भाजीपाला व फूलशेती सुरू केली आहे. गत सहा वर्षांपासुन फूलशेतीचा व्यवसाय करत दरवर्षी १० गुंठ्याच्या गुलाबाच्या शेतीमधून सव्वा ते दीड लाख रूपयांपर्यंत उत्पन्न मिळवले आहे.

तालुक्यातील पांगरा बोखारे येथील गणेश बोखारे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. पाच-सहा वर्षापूर्वीपर्यंत ते  पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. यामध्ये समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होत होते. त्यामुळे ते भाजीपाला शेतीकडे वळले. दोन वर्षे वीस गुंठे शेतीमध्ये त्यांनी भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले. यातही बऱ्याच वेळा नुकसान होत होते. त्यामुळे त्यांनी फूलशेतीचा पर्याय शोधला. जून २०१३ मध्ये त्यांनी  १० गुंठे  शेतात ५०० गुलाबांच्या झाडांची लागवड केली. त्यावेळी त्यांना २७ हजार रूपये खर्च आला. यानंतर ठिबक व्यवस्था केली. गुलाबासाठी मुबलक प्रमाणात पाणी लागते. गुलाबाचा हंगाम वर्षातुन दहा महिने असतो तर दोन महिने उत्पन्नात खंड पडतो. लागवडीनंतर पहिल्या वर्षी त्यांना अल्प प्रमाणात उत्पन्न मिळाले. परंतु बाजारभाव चांगला असल्याने त्यावर्षी १ लाख ९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. एका गुलाबाला पहिल्या हंगामात साधारणत: ६० ते ७० फुले लागतात. 

वर्षभरात एका झाडाला साडेतीनशे ते चारशे फुले निघतात. हंगामानुसार दररोज कमी-अधिक प्रमाणात फुले निघतात. त्याप्रमाणे बाजार भाव देखील ५० रूपयांपासून ते ५०० रुपये किलो पर्यंत असतो. १० महिन्यांचा अंदाज लावल्यास सरासरी दररोज दीड ते दोन हजारांची फुले विकतात. लग्नसराईत गुलाबाला चांगला भाव मिळतो. गत पाच वर्षांपासन दहा गुंठे शेतीमधून दरवर्षी दीड ते दोन लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळते. दररोज सकाळी फुले तोडावी लागतात. ते स्वत: फुले तोडून नांदेडच्या बाजारात विकतात. दहा गुंठ्यात दररोज १० ते १२ किलो फुले निघतात. 

गुलाबाच्या फुलांना मिळतोय चांगला दर...सध्या गुलाबाच्या फुलाचा भाव १५० रुपयांपासून ते २०० पर्यंत असल्याचे ते सांगतात. गुलाब फूलशेतीसाठी फारसे व्यवस्थापन करण्याची गरज नाही. खते व कीटकनाशकेही फारशी लागत नाहीत. केवळ पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांची छाटणी करावी लागते. पाऊस पडताच गुलाब बहारदार बनतो. छाटणी उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरते. झेंडू उत्पादनाचाही त्यांनी अनुभव घेतला आहे. पारंपरिक शेतीसोबतच पूरक व्यवसाय करावा, असे ते सांगतात. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीHingoliहिंगोली