रस्त्यात साचते घाण पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST2021-02-23T04:46:04+5:302021-02-23T04:46:04+5:30

उघड्या डीपीचा धोका वाढला कळमनुरी : तालुक्यातील बहुतांश गावातील रोहित्र उघडे पडले आहे. अनेक गावांतील रोहित्र हे मुख्य रस्त्यावर ...

Dirty water accumulates in the road | रस्त्यात साचते घाण पाणी

रस्त्यात साचते घाण पाणी

उघड्या डीपीचा धोका वाढला

कळमनुरी : तालुक्यातील बहुतांश गावातील रोहित्र उघडे पडले आहे. अनेक गावांतील रोहित्र हे मुख्य रस्त्यावर असून हे रोहित्र उघडे असल्यामुळे रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्यांस धोका निर्माण झाला आहे. यासाठी या उघड्या डीपीची दखल घेऊन त्यांना दार बसविण्याची मागणी अनेक ग्रामस्थांतून होत आहे.

पिकविमा देण्याची मागणी

सेनगाव : तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहिले आहेत. अनेक शेतकऱ्यांना केवळ पिकविम्याचा मेसेज आला असून, त्यांच्या खात्यात अद्यापही पिकविम्याचे पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे बरेच शेतकरी बँकेत चकरावर चकरा मारत आहे. पिकविमा त्वरित मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून वाढली आहे.

गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान

फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव शेतशिवारातील गव्हाचे पीक बहरले असताना, अचानक अवकाळी पावसासह ढगाळ वातावरण व जोराचा वारा झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे गव्हाचे पीक पसरले आहे. यामुळे गव्हाचे पीक काळे पडेल व बाजारपेठेत या पिकास भाव कमी मिळेल, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे.

Web Title: Dirty water accumulates in the road