संतुक पिंपरी ग्रामस्थांतून गतिरोधकाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST2021-02-26T04:43:03+5:302021-02-26T04:43:03+5:30

हिंगाेली - औंढा नागनाथ या नवीन रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे या रस्त्यावरुन अनेक वाहने भरधाव वेगाने धावत ...

Demand for speed bumps from Santuk Pimpri villagers | संतुक पिंपरी ग्रामस्थांतून गतिरोधकाची मागणी

संतुक पिंपरी ग्रामस्थांतून गतिरोधकाची मागणी

हिंगाेली - औंढा नागनाथ या नवीन रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे या रस्त्यावरुन अनेक वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या संतुक पिंपरी गावाजवळ हा रस्ता झाल्यापासून ४ ते ५ अपघात झाले आहे. या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी झालेले आहेत. यामुळे हे गाव अपघाताचे स्थळ बनले जात आहे. यासाठी गावातून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांची गती कमी करण्यासाठी या मार्गावर गतिराेधक टाकण्याची मागणी हाेत आहे. या मार्गावर बसस्थानक, प्राथमिक शाळा आहे. याठिकाणी गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर प्रल्हाद मुकाडे, रमेश पुरी, शामराव ढगे, कैलास खिल्लारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Demand for speed bumps from Santuk Pimpri villagers