दहा दिवसांपासून निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:31 IST2021-03-23T04:31:44+5:302021-03-23T04:31:44+5:30

नालीचे पाणी रस्त्यावर शिरडशहापूर : नालीचे पाणी मुख्य रस्त्यावर आले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना तसेच वाहनचालकांना घाण ...

Dehydrated for ten days | दहा दिवसांपासून निर्जळी

दहा दिवसांपासून निर्जळी

नालीचे पाणी रस्त्यावर

शिरडशहापूर : नालीचे पाणी मुख्य रस्त्यावर आले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना तसेच वाहनचालकांना घाण पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. वेळोवेळी संबंधितांना सांगण्यात आले. परंतु, अजून तरी कोणीही लक्ष दिलेले नाही. ग्रा. पं. ने लक्ष देऊन नाली स्वच्छ करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रखर उन्हाचा शेती कामावर परिणाम

करंजी : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळी शेतातील कामे आटोपून घेत आहेत. दुपारच्या वेळेला प्रखर उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडाचा सहारा घेताना पहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून शेतकरी गहू पिकाच्या काढणीत व्यस्त आहे तर काही शेतकरी मशागतीत व्यस्त आहेत.

कडती रस्ता बनला डोकेदुखी

नर्सी नामदेव: कडती ते हनवतखेडा या दोन किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या भागातील वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी भारत मुटकुळे, बंडू आठवे, शंकर काळे, ज्ञानेश्वर आठवे, रामदास मुटकुळे यांनी केली आहे.

Web Title: Dehydrated for ten days