संचारबंदीचा आदेश झुगारून दुकाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST2021-04-08T04:30:09+5:302021-04-08T04:30:09+5:30

जिल्ह्यात २९ ते ४ एप्रिल दरम्यान संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर सर्व बाजारपेठ सुरू होईल, असे वाटत असतानाच ६ ...

Curfew orders resumed | संचारबंदीचा आदेश झुगारून दुकाने सुरू

संचारबंदीचा आदेश झुगारून दुकाने सुरू

जिल्ह्यात २९ ते ४ एप्रिल दरम्यान संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर सर्व बाजारपेठ सुरू होईल, असे वाटत असतानाच ६ एप्रिल रोजी पुन्हा नव्याने आदेश लागू करण्यात आले. त्यामुळे व्यापाऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. सलग सात दिवस दुकाने बंद असतानाही पुन्हा अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने उघडण्यास निर्बंध घालण्यात आले. तरीही ७ एप्रिल रोजी सकाळपासूनच काही दुकाने उघडण्यास सुरवात झाली होती. पोलीस व नगरपालिकेच्या पथकाने ठिकठिकाणी जावून अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी सुरू केलेली दुकाने बंद करण्यास सुरवात केली. मात्र दुपारनंतरही सराफा बाजार, कापड गल्ली, जवाहर रोड भागातील दुकानदारांनी दुकानाचे अर्धे शटर उघडे ठेवून दुकान सुरू ठेवल्याचे दिसून येत होते. सराफा, कापड, कटलरी आदी दुकानाबाहेर ग्राहक ताटकळत थांबलेले पहावयास मिळाले.

फोटो :

Web Title: Curfew orders resumed