शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:53 IST

नवसाला पावणारा गणपती म्हणून हिंगोली शहरातील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची ओळख सर्वदूर आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाखो भाविक नवसाचा मोदक व दर्शन घेण्यासाठी येतात. यंदा अनंत चतुर्दशीच्या दोन दिवसांपूर्वीच भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नवसाला पावणारा गणपती म्हणून हिंगोली शहरातील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची ओळख सर्वदूर आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाखो भाविक नवसाचा मोदक व दर्शन घेण्यासाठी येतात. यंदा अनंत चतुर्दशीच्या दोन दिवसांपूर्वीच भाविकांची मोठी गर्दी होत आहे.मंगळवारी दिवसभर जवळपास चाळीस ते पन्नास हजार भाविकांनी दर्शन घेतले. सकाळी ९ वाजता इंदिरा चौकापासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दर्शन रांगेत भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने जागोजागी पाणी, चहा व फराळाची व्यवस्था केली होती. तसेच भाविकांचे ऊन व पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी दर्शन रांगेवर ताडपत्रीची व्यवस्था केली होती. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी आपल्या घरासमोर प्रतिष्ठानासमोर भाविकांना चहा, पाणी व फराळाची व्यवस्था केली होती. त्यामुळे येणाºया भाविकांचे सुलभ दर्शन झाले. तसेच बाहेरुन येणाºया वाहनांची पार्किंगची व्यवस्था रामलीला मैदानावर करण्यात आली होती. रहदारीस अडथळा निर्माण होवू नये, यासाठी जागोजागी वाहतूक पोलीस तैनात केले होते. इंदिरा चौक ते गांधी चौकादरम्यान एका बाजूचा रस्ता वाहनांसाठी बंद केला होता. दर्शन रांगेला अडथळा निर्माण होणार नाही याची संपूर्ण खबरदारी पोलीस प्रशासनासह मंदिर समितीने घेतली होती. मंदिर परिसरात बंदोबस्तासाठी ९ पोलीस अधिकारी व दीडशे पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या वर्षी एकच मंडप उभारण्यात आला होता. यंदा तीन मंडप उभारण्यात आले आहेत. मंदिर परिसरात चोवीस तास कडक सुरक्षा ठेवली जात आहे. असे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी सांगितले.यंदा भाविकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ८ वाजेनंतर २ लाख ७१ हजार नवसाचे मोदक वाटपास सुरुवात होणार आहे. मोदक बनविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. गतवर्षी २ लाख ५१ हजार मोदकांचे वाटप केले होते. भाविकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे यंदा २५ हजारांनी मोदक वाढविण्यात असून अनंत चतुर्दशीनंतर पुढील चार दिवस मोदक वाटप केले जाणार असल्याचे मंदिर समितीने सांगितले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवSocialसामाजिक