शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान संचारबंदी लागू केली आहे. सात दिवस सर्व व्यवहार ...

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान संचारबंदी लागू केली आहे. सात दिवस सर्व व्यवहार ठप्प होणार असल्याने नागरिकांनी आठवडाभर पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून ठेवली आहे. यासाठी २८ मार्च रोजी हिंगोली शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी पाहावयास मिळाली.

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. कोराेना आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवीत असले तरी वाढत्या रुग्णसंख्येला अटकाव बसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान अत्यावश्यक वस्तूंची काही दुकाने वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सलग सात दिवस सर्व बाजारपेठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी २८ मार्च राेजी मोठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. दर रविवारी बहुतांश दुकाने बंद ठेवली जातात. मात्र, २८ मार्च रोजी रविवार असूनही नागरिक खरेदी करताना दिसत होते. सकाळी ९ वाजेपासूनच दुकाने उघडण्यास सुरवात झाली होती. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत किराणा, इलेक्ट्रिकल, कपडा, इलेक्ट्रॉनिक्स, भांड्याची दुकाने आदी दुकानांवर मोठी गर्दी पाहावयास मिळाली. त्यामुळे इंदिरा गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक या मार्गावर दुतर्फा गर्दी दिसत होती. वाहने लावतानाही पार्किंग अपुरी पडत असल्याने काही नागरिकांनी रस्त्यावरच वाहने उभी करून खरेदी केली.

पालेभाज्या खरेदीलाही पसंती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी केल्याने तसेच रंगपंचमी, होळी सणानिमित्त खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडले होते. किराणा सामानासह पालेभाज्याही खरेदी करताना नागरिक दिसून येत होते. नागरिकांची गरज लक्षात घेता व्यापाऱ्यांनीही प्रत्येक वस्तूच्या किमती किंचित वाढवीत नफा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, किंमत वाढलेली दिसत असल्या तरी कांदा, लसूण, अद्रक खरेदी करताना नागरिक दिसत होते.