बँकेची कामे आटोपून घरी परतणाऱ्या पती-पत्नीस कंटेनरने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 06:01 PM2021-09-27T18:01:37+5:302021-09-27T18:02:45+5:30

रस्त्यात उभ्या ट्रकला ओव्हरटेक करताना झाला अपघात 

The couple, who were returning home after completing their banking duties, were crushed by the container | बँकेची कामे आटोपून घरी परतणाऱ्या पती-पत्नीस कंटेनरने चिरडले

बँकेची कामे आटोपून घरी परतणाऱ्या पती-पत्नीस कंटेनरने चिरडले

Next
ठळक मुद्देभरधाव कंटेनरने दुचाकीला उडविलेपती-पत्नी जागीच ठार

आखाडा बाळापूर ( हिंगोली ) :  दुचाकीवरून गावाकडे निघालेल्या पती-पत्नीला कंटेनरने जोराची धडक दिली. यात पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. ही घटना कळमनुरी तालुक्यातील वरुड शिवारात नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील रहिवासी असलेले प्रभाकर बावगे ( 55 वर्ष ) व पत्नी सुनीताबाई प्रभाकर बावगे  हे दोघे दुचाकीने डोंगरकडा येथे आले होते. बँकेचे काम आटोपून परत गावाकडे निघाले. यावेळी वरूड शिवारात बंद पडलेल्या ट्रकला ओलांडून जात असताना एका भरधाव वेगातील कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती जमादार  भगवान वडकिल्ले यांनी दिली आहे  .घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी रवाना झाले. 

Web Title: The couple, who were returning home after completing their banking duties, were crushed by the container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.