मोफत पुस्तके परत करण्याला कोरोनाचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:30 AM2021-05-09T04:30:37+5:302021-05-09T04:30:37+5:30

हिंगोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत वाटप केलेल्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी जुनी पुस्तके परत करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने पालकांना ...

Corona's hindrance to returning free books | मोफत पुस्तके परत करण्याला कोरोनाचा अडथळा

मोफत पुस्तके परत करण्याला कोरोनाचा अडथळा

Next

हिंगोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत वाटप केलेल्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी जुनी पुस्तके परत करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने पालकांना केले होते. मात्र, कोरोनामुळे पुस्तके परत करण्याला अडथळा निर्माण होत असून सध्या मोजक्याच पालकांनी पुस्तके परत केली आहेत.

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यान्वये मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. कोरोनामुळे वर्षभर इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळाही उघडण्यात आल्या नव्हत्या. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष संपले असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे मोफत पुस्तके वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाने सुरू केले आहे. जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर व्हावा, यासाठी जुनी पुस्तके परत करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. मात्र, जिल्ह्यात सध्या कोरोनाचा उद्रेक कायम असून नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. विद्यार्थीही शाळेकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जुनी पुस्तके परत करण्याला अडथळा निर्माण होत आहे. सध्या मोजक्याच पालकांनी पुस्तके परत केली आहेत.

मोजकीच पुस्तके आली परत

- अपवादात्मक परिस्थितीत मोफत पुस्तकाचे संच कमी आल्यास, अशा वेळी ही पुस्तके इतर विद्यार्थ्यांना देण्यासाठी कामी येतात. त्यामुळे पालकही जुनी वापरलेली पुस्तके परत करण्याला प्राधान्य देतात.

- शिक्षण विभागाने जुनी पुस्तके परत करण्याचे आवाहन केले असले तरी कोरोनामुळे संसर्गामुळे जुनी पुस्तके परत करण्याला निर्बंध आले आहेत.

- कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर ही पुस्तके परत करण्याचे नियोजन पालकांनी आखले आहे. सध्या पुस्तके परत करण्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

पालक म्हणतात...

सध्या कोरोनामुळे घराबाहेर पडणे आवघड झाले आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर जुनी वापरलेली पुस्तके शाळेत जमा केली जातील.

- महादेव धाबे

जुनी वापरलेली पुस्तके इतर विद्यार्थ्यांना देण्यासाठी कामी येतील. त्यामुळे मी पुस्तके परत करणार आहे. मात्र सध्या कोरोना असल्याने पुस्तके परत करण्यासाठी शाळेवर जात नाही.

- मिलिंद मस्के

सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत दिलेली पुस्तके वापरानंतर परत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या काही पालकांनी जुनी वापरलेली पुस्तके परत केली आहेत. यास प्रतिसाद मिळत आहे.

- संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्रा.)

Web Title: Corona's hindrance to returning free books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.