शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांत ९ जणांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:31 IST

हिंगोली: जिल्ह्यात गत आठ दिवसांमध्ये कोरोना संसर्गामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ दिवसांमध्ये ६९८ रुग्ण आढळून आले ...

हिंगोली: जिल्ह्यात गत आठ दिवसांमध्ये कोरोना संसर्गामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ दिवसांमध्ये ६९८ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असताना अनेकजण मात्र बिनधास्तपणे विनामास्क फिरताना दिसून येत आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी १ ते ७ मार्चदरम्यान संचारबंदी लागू केली होती. याकाळात २६५ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर संचारबंदी उठली गेली की, विनामास्क फिरणाऱ्यांना रान मोकळे झाले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. संचारबंदीच्या काळात शहर थांब्यावर बसेस थांबविल्या जात नव्हत्या. आजमितीस पर जिल्ह्यातील बसेस बिनधास्तपणे शहर थांब्यावर थांबत आगारात येत आहेत. बसस्थानकात अँटीजन तपासणी होत असली तरी तपासणीच्या भीतीपोटी काही प्रवासी थांब्यावरच उतरत आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचा दोन अंकी आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. १२ मार्च रोजी ४९ रुग्ण, १३ मार्च रोजी ६७ रुग्ण, १४ मार्च रोजी ४४ रुग्ण, १५ मार्च रोजी ९३ रुग्ण, १६ मार्च रोजी ७३ रुग्ण, १७ मार्च रोजी ५४ रुग्ण, १८ मार्च रोजी ८७ रुग्ण, १९ मार्च रोजी ४८ रुग्ण, २० मार्च ११३ रुग्ण आणि २१ मार्च रोजी ७० रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने प्रत्येक नागरिकाने स्वत:बरोबर इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

९ जणांचा मृत्यू

जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांतही झपाट्याने वाढ होत आहे. १५ मार्च रोजी १, १६ मार्च रोजी १, १७ मार्च रोजी २, १८ मार्च रोजी २, १९ मार्च रोजी १, २० मार्च रोजी १ आणि २१ मार्च रोजी १ जण कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावला आहे.

बसस्थानकात तपासणी सुरुच

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस आढळून येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने बसस्थानकात १ मार्चपासून अँटीजन तपासणी सुरु केली आहे. बसस्थानकातील तपासणीचा आढावा घेतला असता अँटीजन तपासणीत ४५ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बसस्थानकात तपासणीसाठी डॉ. जावेद अतहर, स. इमरान अली, आरती धोबी, राजेश जाधव, पवन खरात आदी सहकार्य कार्य करीत आहेत.