कोरोनाने चौघांचा मृत्यू; नवे १०२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST2021-04-02T04:31:08+5:302021-04-02T04:31:08+5:30

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली पिरसरात रिसाला बाजार ४, देवडानगर १, कळमनुरी १, तोफखाना १, माळधामणी १, पेन्शनपुरा १, वंजारवाडा १, ...

Corona killed four; 102 new patients | कोरोनाने चौघांचा मृत्यू; नवे १०२ रुग्ण

कोरोनाने चौघांचा मृत्यू; नवे १०२ रुग्ण

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली पिरसरात रिसाला बाजार ४, देवडानगर १, कळमनुरी १, तोफखाना १, माळधामणी १, पेन्शनपुरा १, वंजारवाडा १, अण्णा भाऊ साठेनगर १, सरस्वतीनगर १, दत्तनगर १, बळसोंड १ अशा १४ जणांचा समावेश आहे. सेनगाव तालुक्यातील बोंडाळा येथेही सात बाधित आढळले. औंढा तालुक्यात लोहरा खु. येथे ३, तर काठोडा तांडा येथे १ बाधित आढळला.

आज एकूण १४२ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये सामान्य रुग्णालयातून ४३, लिंबाळा येथून २५, औंढा येथून ८, कळमनुरीतून ५१, तर सेनगावातून १५ जणांना घरी सोडले आहे.

चौघांचा मृत्यू झाल्याने हादरा

हिंगोली जिल्ह्यात काल सहाजण कोरोनाने दगावले; तर आज पुन्हा चारजणांचा मृत्यू झाला आहे. यात कळमनुरी तालुक्यातील बोल्डा येथील ७० वर्षीय पुरुष, हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथील ७८ वर्षीय महिला, कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसई येथील ७० वर्षीय महिला तर वसमत तालुक्यातील एक ७० वर्षीय पुरुष दगावला आहे.

सक्रिय रुग्ण ७१७, दीडशे गंभीर

हिंगोली जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे ६६६९ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ५८५८ जण बरे झाल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे, तर सध्या ७१७ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे ९४ जणांचा मृत्यू झाला आहे. दाखल असलेल्यांपैकी १४० जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले, तर अन्य दहाजणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशिनवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: Corona killed four; 102 new patients