शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

'बांगर यांच्याकडून गोपनीयतेचा भंग'; मुटकुळेंची तक्रार, निवडणूक आयोगाने अहवाल मागवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:02 IST

गोपनीयतेचा भंग केल्याचा आमदार संतोष बांगर यांच्यावर आरोप

हिंगोली : हिंगोली नगरपालिका निवडणुकीत मतदान केल्यानंतर घोषणाबाजी केल्याने आमदार संतोष बांगर यांच्यावर गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. २ डिसेंबर रोजी मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. दरम्यान, या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याची माहिती भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिली आहे.

हिंगोली नगरपालिकेसाठी शहरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या प्रक्रियेदरम्यान आमदार संतोष बांगर हे मंगळवारी सकाळी मतदान करण्यासाठी केंद्रावर गेले. मतदान केंद्रात मतदान केल्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी घोषणाबाजी केली. त्याचे चित्रीकरणही करण्यात आले. मतदान केंद्रामध्ये मतदानानंतर घोषणाबाजी करताना त्यांचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. हा गोपनीयतेचा आणि आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाकडे तक्रार : आ.तान्हाजी मुटकुळेआमदार संतोष बांगर यांच्याविषयी मागच्या आठवड्यापासून आम्ही आरोप करीत आहोत. आज ते त्यांनी सिद्ध करुन दाखविले.  मतदान केंद्रावर जाऊन घोषणाबाजी करणे, मतदान केंद्रात एका महिलेच्या हाताला धरुन तिला मतदान कुठे करायचे ते सांगणे, हा प्रकार आचारसंहिता भंगाचा प्रकार आहे. त्याविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे, असे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सांगितले.

अहवाल मागवून कारवाईआमदार संतोष बांगर यांच्याबाबत समाज माध्यमावर व्हिडिओ फिरत आहे. त्यात प्रथमदर्शनी केंद्रामध्ये अनधिकृतरित्या मोबाईल वापरणे व हातवारे केल्याचे दिसत आहे. या अनुषंगाने गोपनीयतेचा भंग झाल्याबाबतचा अहवाल मतदान केंद्राध्यक्षाकडून मागवून पुढील कारवाई केली जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटूकडे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : MLA Bangar faces complaint for sloganeering at polling booth

Web Summary : MLA Bangar is accused of violating secrecy by sloganeering after voting. BJP MLA Mutkule complained to the Election Commission. An inquiry has been launched.
टॅग्स :santosh bangarसंतोष बांगरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना