वसमत शहरातून दुचाकी लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:30 AM2021-05-18T04:30:39+5:302021-05-18T04:30:39+5:30

शहरातील स्वांतत्र कॉलनीत गजानन गंगाधर इंगोले (रा. मालेगाव ता. अर्धापूर) हे राहतात. नेहमीप्रमाणे त्यांनी बजाज कंपनीची दुचाकी १४ मे ...

The bike was taken out of Wasmat city | वसमत शहरातून दुचाकी लांबविली

वसमत शहरातून दुचाकी लांबविली

Next

शहरातील स्वांतत्र कॉलनीत गजानन गंगाधर इंगोले (रा. मालेगाव ता. अर्धापूर) हे राहतात. नेहमीप्रमाणे त्यांनी बजाज कंपनीची दुचाकी १४ मे रोजी घरासमोर उभी केली होती. १५ मे रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घरासमोरून ही दुचाकी चोरट्यांनी लांबविल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गु्न्हा नोंद करण्यात आला आहे. शहर पोलीस तपास करीत आहेत.

साडेतीन हजारांची दारू पकडली

हिंगोली : पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत १६ मे रोजी एका अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी ३ हजार ४५० रूपये किमतीची ४.१४ लिटर दारू जप्त केली. तसेच दारू बनविण्याचे साहित्य ही जप्त केले. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात दारू विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: The bike was taken out of Wasmat city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.