शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:31 IST

हिंगोली : दुष्काळ, अतिवृष्टीमुळे हाती आलेले पीक हिरावून घेतले जात आहे. त्यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठण करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत ...

हिंगोली : दुष्काळ, अतिवृष्टीमुळे हाती आलेले पीक हिरावून घेतले जात आहे. त्यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठण करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. थकीत कर्जामुळे बँका पुन्हा पीक कर्ज देण्याचे नावही घेत नव्हत्या. मात्र, कर्जमुक्तीनंतर पीक कर्ज देण्यास बँकांनी सुरुवात केल्याने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे.

खरीप व रबी दाेन्ही हंगामांसाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. घेतलेले पीक कर्ज ३१ मार्चपूर्वी भरणे आवश्यक असते. मात्र, सततची नापिकी व इतर संकटांमुळे शेतकरी कर्ज भरू शकत नाहीत. थकीत कर्जदाराला बँका पुन्हा नव्याने कर्ज देत नाहीत. मात्र, २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजना राबविण्यात आली. या याेजनेंतर्गत २००९ ते २०१६ या कालावधीतील थकीत कर्ज माफ केले. मात्र, प्रत्यक्षात कर्जमाफीची रक्कम मिळण्यास उशीर झाला. तसेच २०१६ नंतरचेही कर्ज माफ हाेईल, या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी पीककर्ज भरले नाही. थकीत कर्जदारांची संख्या वाढतच गेली. त्यामुळे २०१७ ते २०२० या कालावधीत कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून येते. त्यानंतर, पुन्हा विद्यामान राज्य शासनाने २१ डिसेंबर २०१९ राेजी महात्मा फुले कर्जमुक्ती याेजनेची घाेषणा केली. या याेजनेंतर्गत पुन्हा ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत कर्ज माफ केले. याचा जिल्ह्यातील जवळपास ९० हजार ६३६ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. त्यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सव्वा टक्क्याने वाढली असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात २०२०-२१ यावर्षी विविध बँकांमार्फत १४४३ कोटी ७४ लाखांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. याअंतर्गत १ लाख ११ हजार शेतकऱ्यांना ७२५ कोटी ४७ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले असून याची टक्केवारी ५०.२५ असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितली.

पीक कर्जमाफीनंतर पुन्हा आखाडा बाळापूर येथील भारतीय स्टेट बँकेतून पीक कर्ज उचलले आहे. कर्जमाफीमुळेच पुन्हा पीक उचलता आले. या रकमेतून खरीप हंगामातील पेरणी करता आली.

-शांताबाई सुधाकर माखणे, साळवा

सततची नापिकी व अतिवृष्टीमुळे घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठण करताना अडचणी येत होत्या. शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला. त्यानंतर बँकेने पुन्हा पीक कर्ज दिले आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी रक्कम कामी आली.

- अरुणा देवीदास माखणे, साळवा

कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या - ९०६३६

खरीप पीक कर्जाची आकडेवारी (रक्कम रु. लाखात)

२०१६-१७ -९६८५०.००- ६५७११.३७

२०१७-१८ -८८५२५.०० - १५५८०.९९

२०१८-१९ - ९५९००.०० - २७३१८.८१

२०१९-२० - ११६१९६.७७ -१९२३४.५२

२०२०-२१ - ११६८९५.०० -२०७५८.५३